Accepting responsibility for defeat; will request party leaders to quit government; Devendra Fadnavis's big statement after Lok Sabha results
Sharad Pawar Group’s official Twitter handle : लोकसभेच्या काल लागलेले निकाल अनेकांसाठी धक्कादायक होते. भाजपच्या अनेक दिग्गजांचा यामध्ये दारुण पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत, या पराभवाची जबाबदारी घेत, मला सरकारमधून मोकळं करावं, अशी पक्षश्रेष्ठींकडेच विनंतीवजा मागणी केली आहे. यावर शरद पवार गटाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून फडणवीसांना उद्देशून खोचक मोठी पोस्ट व्हायरल होतेय.
कुठे गेले ४०० आणि ४५ पारचे नारे, आता तर हेच सत्तेतून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करू लागले. कुठून कुठंवर आला "देवा"!! pic.twitter.com/twqySyZdq1
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 5, 2024
पोस्टमध्ये काय काय
आता यावरूनच राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असल्या तरी शरद पवार गटाच्या offocial अकाऊंटवरून देवेंद्र फडणवीसांचा मागील मुलाखतीचा व्हिडीओ पोस्ट झालेला दिसत आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून 45 जागांचा दावा करताना दिसत आहे. त्याचबरोबर भाजप मुंबई कार्यालयात विजयी जल्लोषाकरिता मोठ्या लाडूंची order दिल्याची बातमी देखील पोस्ट केली आहे. परंतु, एवढ्या बातम्या येऊन प्रत्यक्षात उलटेच झाले आहे. त्यामुळे ही खोचक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
कुठून कुठंवर आला ‘देवा’
त्यानंतर या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कुठे गेले ४०० आणि ४५ पारचे नारे, आता तर हेच सत्तेतून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करू लागले. कुठून कुठंवर आला “देवा”!! अशी खोचक टिप्पण्णी देखील करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे
महाराष्ट्रातील या गोष्टींवर आम्ही कमी पडलो
शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर आम्ही प्रभावी उपाय देऊ शकलो नाही. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर आम्ही योग्य तोडगा लवकर काढायला कमी पडलो. हे आमच्या पराभवाचे कारण ठरले. त्यानंतर विरोधकांनी जो नॅरेटिव्ह सेट केला होता. यामध्ये संविधान बदलाचा मोठा नॅरेटिव्ह विरोधकांनी सेट केला होता.
तो काऊंटर अटॅक करायला आम्ही कमी पडलो. त्याचबरोबर काही ठिकाणी आम्ही उमेदवार द्यायला उशीर केला. काहींची इनकमिंग आमच्यासाठी चुकीची ठरली अशी अनेक कारणे आमच्या पराभवाला असल्याचे दिसून येतेय. याचा सर्वाचा विचार आम्ही करणार आहोत, असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
सरकारमधून बाहेर पडण्याची विनंती
आम्हाला मते मागच्या एवढीच मते पडली, त्यांचे टक्केवारी काही अंशांनी कमी पडली. परंतु, आमची सिट निश्चित कमी झाली आहेत. त्याचबरोबर या पराभवाची मी नक्कीच जबाबदारी घेतोय. मी पळून जाणारा माणूस नाही. त्यानंतर त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची विनंती केली आहे. हे सगळ्यात मोठे वक्तव्य त्यांनी भर पत्रकार परिषदेत केले.
सरकारमधून मोकळं करावे ही विनंती
माझ्या वरिष्ठांना मी विनंती करतो, आता मला विधानसभेकरिता पूर्णवेळ उतरायचे आहे. मला सरकारमधून वेगळे करावे, जेणेकरून मला तिथे काम करता येईल. मला सरकारमधून बाहेर पडावे ही विनंती करणार आहे. कारण सरकारमध्ये राहून मला हे करता येणार नाही याकरिता मला पूर्णवेळ बाहेर राहून काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती मी पक्षश्रेष्ठींना पाठवणार आहे.