aditya thackeray
मुंबई : सध्या राज्यात वेदांत्ता (Vedanta Project) व बल्क ड्रर्ग पार्क (Bulk Drug Park) प्रकल्पावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना कोडींत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) वेदांत प्रकल्प तसेच अन्य प्रकल्पावरुन सरकारला (State government) धारेवर धरताना दिसत आहेत. काल ज्या ठिकाणी वेदांत्ता प्रकल्प होणार होता, त्याठीकाणी जाऊन आंदोलन केले. त्यानंतर आज आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर नवा आरोप केला आहे. वेदांत्ता व ड्रग बल्क पार्कनंतर आता औरंगाबाद येथे प्रस्तावित असणारा प्रकल्प सुद्धा राज्याबाहेर गेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.
[read_also content=”भाविकांसाठी खूशखबर! नवरात्री उत्सवानिमित्त एकविरा मंदिर चोवीस तास खुले राहणार https://www.navarashtra.com/navratri-festival/ekvira-devi-mandir-open-twenty-four-hours-for-navratri-festival-329647.html”]
दरम्यान, आदित्य ठाकरे आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मेडिसीन डिव्हाइस पार्क (Medicine Device Park) इतर राज्यात गेलेला आहे. त्या प्रकल्पांसाठी अनुदान देखील जारी करण्यात आलं आहे. राज्य सरकरानं या प्रकल्पाबद्दल राज्यातील तरुणांना माहिती देखील दिलेली नाही, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केली आहे. दरम्यान, या तीन मोठ्या प्रकल्पामुळं राज्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असता, परंतू राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळं तरुणांना नोकरीस मुकावं लागले. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ असताना महाराष्ट्रापासून आणखी एक प्रकल्प हिरावून घेण्यात आला आहे. याबद्दल सत्ताधाऱ्यांना, उद्योगमंत्र्यांना माहिती आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरेंच्या या आरोपाला आता शिंदे-फडणवीस कसं उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.