Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सव लोकाभिमुख करण्याचे काम; अजित पवारांकडून गणेश मंडळांचे कौतुक

  • By युवराज भगत
Updated On: Sep 15, 2023 | 06:07 PM
सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सव लोकाभिमुख करण्याचे काम; अजित पवारांकडून गणेश मंडळांचे कौतुक
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : गणेशाेत्सव हा केवळ भक्तीपुरता मर्यादित न ठेवता, सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ताे लाेकाभिमुख करण्याचे काम गणेश मंडळे करीत असतात, असे काैतुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

मोफत जेवण कक्षाचे उद्घाटन

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळामार्फत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू केलेल्या मोफत जेवण कक्षाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बाेलत हाेते. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, संचालक गणेश घुले, अनिरुद्ध ऊर्फ बाप्पु भोसले, संतोष नांगरे,  नाना आबनावे,  मंडळाचे अध्यक्ष सागर भोसले, कार्याध्यक्ष प्रसाद गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचेे शहराध्यक्ष दिपक मानकर,  गौरव घुले, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, दत्ता सागरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे आदी उपस्थित होते.

जय शारदा गजानन पुरस्काराचे वितरण
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते देण्यात येणाऱ्या ‘जय शारदा गजानन पुरस्काराचे’ वितरण झाले. विलास भुजबळ ( आदर्श आडतदार ), पंडीत आहेर ( आदर्श व्यापारी ), किसन कानगुडे ( आदर्श हमाल ), राजेश माेहाेळ (आदर्श तोलणार), शंकर साबळे (आदर्श टेम्पाे चालक ), प्रमाेद जाधव ( आदर्श पत्रकार ), राजेंद्र घुले ( उत्कृष्ट कर्मचारी ) यांना हा पुरस्कार दिला गेला. स्मृतिचिन्ह,  पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

शेतकरी हा लाखांचा पोशिंदा

उपमुख्यमंत्री पवार यांनी मंडळाने सुरु केलेल्या माेफत जेवण उपक्रमाचे काैतुक केले. ते म्हणाले, शेतकरी हा लाखांचा पोशिंदा आहे. त्यामुळे त्याच्याकडे  वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे. समाजालातील प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी तो राबतो. त्यामुळे त्यालाही पोटभर चांगल जेवण मिळालं पाहिजे. हा हेतू चांगला आहे.’’

शेतकऱ्यांना निधी कमी पडू देणार नाही
राज्यातील काही भागात सध्या अवर्षणाची परिस्थिती आहे. गेल्या चार-पाच दिवसात काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी तो पुरेसा नाही. शेतकऱ्यांसमोर बिकट संकट उभे राहिले असून पिकांचे नुकसान होत आहे. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून  देण्यासाठी, शेतकऱ्यांपुढील संकटावर मात करण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

समितीचा नावलाैकिक वाढविण्याचा सल्ला
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडीअडचणी, शेतकऱ्यांच्या काही सूचना असतील तर त्या सोडविण्यात येतील असे नमूद करतानाच उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वच्छतेबाबत बाजार समिती आणि पुणे महानगरपालिकेने समन्वय ठेवावा.  बाजार समिती सर्वच बाबतीत पुढे राहील, तिचा नावलौकीक वाढेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असा सल्लाही त्यांनी संचालकांना दिला.

Web Title: Ajit pawar praises ganesh mandal they say ganeshotsav should not be limited to devotion but should be made public through social activities nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2023 | 05:37 PM

Topics:  

  • Deputy CM Ajit Pawar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.