Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंदे-भाजप सरकारमध्ये अजित पवार गट अस्वस्थ; निधी मिळत नसल्याचा आरोप

Maharashtra Politics: येत्या 21 नोव्हेंबरला अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. आतापासून नियमित दर मंगळवार आमदारांची आठवडा बैठक होणार आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Nov 13, 2023 | 04:17 PM
Deputy Chief Minister Ajit Pawar

Deputy Chief Minister Ajit Pawar

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Politics : आधी शिवसेनेतील (Shiv Sena) बंड आणि त्यानंतर राष्ट्रवादीतील (NCP) अजित पवार (Ajit Pawar) यांचं बंड यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) प्रचंड उलथापालथ पाहायला मिळाली. अशातच ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी आणि थोरल्या पवारांची साथ सोडून अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी भाजपसोबत विराजमान झाले.

सरकार स्थापन झाल्यापासूनच सर्वकाही आलबेल

महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासूनच सर्वकाही आलबेल असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच आमदार करताहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या अनेक बैठका आणि कार्यक्रमांना असलेली अनुपस्थिती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याचबाबत राजकीय वर्तुळात अजित पवार गट सध्या नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ही नाराजी निधीवाटपावरून सुरू असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.

21 नोव्हेंबरला अजित पवारांच्या निवासस्थानी बैठक
येत्या 21 नोव्हेंबरला अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. नियमित दर मंगळवार आठवडा आमदार बैठक होणार आहे. मागील तीन आठवडे अजित पवार मात्र या बैठकीस उपस्थितीत नव्हते. अजित पवार गटात विकास निधी वाटपावरून नाराजीचा सूर असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरच या बैठकीत चर्चा होणार असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवारांच्या देवगिरी बंगला येथे 21 तारखेला मंगळवारी बैठक पार पडणार आहे.

आमदारांना योग्य न्याय मिळत नसल्याची तक्रार

अजित पवार गटातील आमदार नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. निधी वाटपात आमदारांना योग्य न्याय मिळत नसल्याची तक्रार वरिष्ठांकडे केल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्र्यांचं नगरविकास, सामजिक न्याय या खात्यांसह रोजगार हमी, मृदू आणि जलसंधारण, अल्पसंख्याक, ग्रामविकास खात्यांबाबतही अजित पवार गटातील आमदार नाराज असल्याची माहिती मिळत आहे. भाजप आणि शिंदे गटातील आमदारांच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या आमदारांना कमी निधी मिळत असल्याचा आरोप, अजित पवार गटातील आमदारांनी केला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

शिंदेंच्या आमदारांनी केलेली अजित पवारांवर दुजाभावाची तक्रार
शिवसेनेतील प्रबळ नेते असलेल्या एकनाथ शिंदेंनी बंडल केलं आणि राज्याचं संपूर्ण राजकारण ढवळून निघालं. ठाकरेंची साथ सोडून शिंदे भाजपशी हातमिळवणी करत सत्तेज विराजमान झाले. तेव्हा शिंदेंसह गेलेल्या आमदारांनी ठाकरेंची साथ सोडण्याचं सर्वात मोठं कारण महाविकास आघाडी असल्याचं सांगितलं होतं. तसेच, महाविकास आघाडी सरकारमध्ये निधीवाटपावरुन होत असलेला दुजाभाव हे सर्वात महत्त्वाचं कारण असल्याचं शिंदे गटातील आमदारांनी सांगितलं होतं. महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले अजित पवार निधीवाटप करताना दुजाभाव करत असल्याचा आरोप शिंदे गटातील आमदारांनी केला होता. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींमध्ये आता मागचीच वेळ पुढे आलीये, फक्त पात्र वेगळी आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

Web Title: Ajit pawars group is now upset because of same reason that shinde proposed a separate hearth alleged non availability of funds nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2023 | 04:17 PM

Topics:  

  • Deputy Chief Minister Ajit Pawar
  • Deputy CM Ajit Pawar

संबंधित बातम्या

कार्यकर्त्याचा ‘तो’ फोन जाताच उपमुख्यमंत्री अजित पवार महिला IPS अधिकाऱ्यावर भडकले; ‘तुमचं एवढं धाडस, मला…’
1

कार्यकर्त्याचा ‘तो’ फोन जाताच उपमुख्यमंत्री अजित पवार महिला IPS अधिकाऱ्यावर भडकले; ‘तुमचं एवढं धाडस, मला…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.