अंत्यविधीसाठी गेलेल्या मायलेकीच झाल्या अनंतात विलीन, मुर्तीजापूर येथील घुंगशी बॅरेज मधील घटना
पारद येथील गौरव तायडे हे त्यांची पत्नी प्रिया तायडे (वय २८) व मुलगी आराध्या (वय २) यांच्यासह दर्यापूर तालुक्यातील धामोडी येथे मावशीच्या अंत्यविधीसाठी गेले होते. या दरम्यान मुलगी गेटच्या बाजूला गेली तेव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली.
मूर्तिजापूर : तालुक्यातील पारद एका मायलेकींसोबत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील घुंगशी बॅरेज वरुन येत असताना आराध्याचा (वय २) पाय घसरुन ती बॅरेजमध्ये कोसळली. तिला वाचविण्यासाठी आई व वडिलांनी उडी घेतली. तर, यात त्या दोन वर्षोय चिमुकलीसह तिच्या आईचा मृत्यू झालेला आहे. तर, चौकीदाराच्या प्रसंगावधानाने वडिलांचे प्राण वाचले. ही घटना ६ फेब्रुवारी रोजी सकाळी सातच्या सुमारास घडली आहे.
[read_also content=”शेगावरात्री डी.जे. वाजवण्यास मज्जाव का म्हणून केला चक्क शेगावच्या पोलीस ठाण्यावर हल्ला…. https://www.navarashtra.com/buldhana/vidarbha/buldhana/night-dj-chakka-shegaons-police-station-was-attacked-as-it-was-forbidden-to-play-nraa-233887.html”]
पारद येथील गौरव तायडे हे त्यांची पत्नी प्रिया तायडे (वय २८) व मुलगी आराध्या (वय २) यांच्यासह दर्यापूर तालुक्यातील धामोडी येथे मावशीच्या अंत्यविधीसाठी गेले होते. अंत्यविधी आटोपून दुस-या दिवशी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी सातच्या सुमारास परत येत असताना बॅरेज जवळ आल्यानंतर गेट बंद असल्याने चौकीदार संजय गवई यांना चावी मागीतली. या दरम्यान मुलगी गेटच्या बाजूला गेली तेव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी आई प्रिया व वडिल गौरव यांनी पाण्यात उडी घेतली.
[read_also content=”रेड क्रॉस सोसायटीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे राज्यपाल कोश्यारी यांचे निर्देश, प्रत्यक्ष भेटीनंतर घेतला निर्णय https://www.navarashtra.com/maharashtra/vidarbha/washim/governor-koshyaris-directive-to-make-space-available-for-the-red-cross-society-was-decided-after-a-face-to-face-meeti”]
यावेळी, चौकीदार संजय गवई यांनी आरडाओरडा केला तेव्हा बाजूला असलेल्या भोई समाजातील युवक धावुन आला. तर, त्यांने पाण्यात दोर फेकला. या दरम्यान माय लेकीचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला होता. परंतु, वडील गौरव यांनी दोर पकडल्याने त्याचे प्राण वाचले. घुंगशी बॅरेज पारद येथे असले तरी घटनास्थळाचा भाग दर्यापूर पोलिस स्टेशन हद्दीत येतो. घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिस व जिल्हा शोध बचाव पथक, जिल्हाधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने आई व नंतर चिमुकलीचा मृतदेह शोधून शवविच्छेदनासाठी दर्यापूर येथे पाठविले. पुढील तपास ठाणेदार आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर पोलीस करीत आहे.
[read_also content=”अनैतिक संबंधांमुळे गेला आणखी एक जीव, महिलेच्या त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या https://www.navarashtra.com/article/another-life-was-lost-due-to-immoral-relationship-a-23-year-old-man-committed-suicide-after-getting-fed-up-with-a-womans-troubles-nraa-2″]
तर, मृतक प्रिया गौरव तायडे व तिची मुलगी आराध्या यांच्या मृत्यू बद्दल प्रियाचे वडील विठ्ठल फुंडकर राहणार हनवतखेडा यांनी आक्षेप घेतला आहे. दोघींचा मृत्यू नेमका पाय घसरून झाला की त्यांनी उडी घेतली की त्यांना पाण्यात ढकलून देण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी दर्यापूर पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
Web Title: Incident at ghungshi barrage at murtijapur nraa