Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“सुपुत्राचा पराभव का झाला यावर भाष्य करा, ५ वाजता उठून…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा राज ठाकरेंना खोचक टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वरळीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक निकालावर शंका उपस्थित होतील असं भाष्य केलं.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 30, 2025 | 10:40 PM
“सुपुत्राचा पराभव का झाला यावर भाष्य करा, ५ वाजता उठून…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा राज ठाकरेंना खोचक टोला

“सुपुत्राचा पराभव का झाला यावर भाष्य करा, ५ वाजता उठून…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा राज ठाकरेंना खोचक टोला

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वरळीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक निकालावर शंका उपस्थित होतील असं भाष्य केलं. एवढंच नाही तर अजित पवारांना ४२ जागा कशा काय मिळाल्या? त्यांना पाच ते सहा जागा मिळणंही कठीण होतं, लोकांनी मतं दिली आहेत ती आपल्यापर्यंत पोहचली नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता, त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) च्या नेत्याने राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

भाजपाला १३२ जागा मिळाल्या चला ठीक आहे. २०१४ ला त्यांना १२२ जागा मिळाल्या होत्या, नंतर १०५ आल्या, आता १३२ आल्या समजू शकतो. अजित पवारांचे ४२ आमदार निवडून आले? त्यांचे चार पाच आमदार तरी येतील का? असं सगळ्यांना वाटत होतं. कुणाचा तरी विश्वास बसेल का? जे इतके दिवस राज्यात राजकारण करत आले आहेत, ज्यांच्या जिवावर भुजबळ, अजित पवार मोठे झाले त्या शरद पवारांना १० जागा? न समजण्याच्या पलिकडची गोष्ट आहे. चार वेळा लोकसभा निवडणूक झाली. त्यावेळी सर्वाधिक खासदार काँग्रेसचे निवडून आले. त्यांचे यावेळी फक्त १५ आमदार निवडून आले. लोकसभेला एक खासदार निवडून आलेल्या अजित पवारांचे ४२ आमदार आले? काय झालं, कसं झालं हा संशोधनाचा विषय आहे.

मी तुम्हाला सांगायला आलो आहे की मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे, ते आपल्यापर्यंत आलं नाही. लोकांनी मतदान केलं, पण ते गायब झालं. अशा प्रकारे निवडणूक लढवायची असेल तर कशाला निवडणूक लढवायची? ही गोष्टही निघून जाईल, कुणीही अमरपट्टा घेऊन जन्माला येत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंना उशिरा उठून चिंतन करण्याची सवय असल्याने आज विधानसभा निकालाच्या दीड महिन्यानंतर त्यांचं वक्तव्य समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४२ जागा कशा आल्या? याचा शॉक त्यांना दीड महिन्यानी बसला आहे. अजित पवार दिवसरात्र काबाडकष्ट करतात, मेहनत करतात त्यामुळे विधानसभेत त्यांना ४२ जागांपर्यंत मजल मारता आली. राज ठाकरेंनी सुपुत्राचा दारुण पराभव का झाला? आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत? यावर त्यांनी भाष्य करावं. त्यासाठी त्यांनी अजित पवारांसारखं पहाटे पाच वाजल्यापासून कामाला लागलं पाहिजे असा खोचक सल्ला अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना दिला आहे.

Web Title: Amol mitkari slams raj thackeray on maharashtra vidhan sabha election result comment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 10:34 PM

Topics:  

  • Amol Mitakari
  • Maharashtra Politics news
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
1

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Thackeray Brothers Alliance: ठरलं तर, ठाकरे बंधु एकत्र येणार…! संजय राऊतांची मोठी घोषणा
2

Thackeray Brothers Alliance: ठरलं तर, ठाकरे बंधु एकत्र येणार…! संजय राऊतांची मोठी घोषणा

“जैन मुनींनी विचार करणे गरजेचे, उगाच धर्माच्या नावाखाली…”; कबुतरखान्याच्या वादावर राज ठाकरे संतापले
3

“जैन मुनींनी विचार करणे गरजेचे, उगाच धर्माच्या नावाखाली…”; कबुतरखान्याच्या वादावर राज ठाकरे संतापले

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्रित येण्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट; चेन्नीथला म्हणाले, “राज ठाकरे सध्या…”
4

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्रित येण्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट; चेन्नीथला म्हणाले, “राज ठाकरे सध्या…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.