आधी नेपाळ, नंतर केरळ, अखेर भातुकलीचा निरंजन परतणार पुन्हा अमरावतीच्या मातीत ; पालकमंत्री यशोमती ठाकुरांनी केली व्यवस्था
पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी त्वरित पाऊल उचलत थिसुर येथील मनोवैज्ञानिक केंद्रातील डॉक्टर सुब्रमण्यम यांच्याशी चर्चा केली. तसेच, निरंजनला पुन्हा परत घरी आणण्याची परवानगी मिळविली.
First Nepal, then Kerala, finally Niranjan of Bhatukali will return again to the soil of Amravati; Arrangements made by Guardian Minister Yashomati Thakur
अमरावती : निरंजन रामेकर हा अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथील रहिवासी आहे. निरंजनला हा मानसिकदृष्ट्या आजारी आहे. त्याच आजाराच्या कारणाने त्याने आपल्याच शेतातील पिके जाळले. त्यामुळे, त्याच्या वडिलांनी संतापून पोलिसांकडे तक्रार केली. तर, निरंजनला केंद्रीय कारागृहात ठेवण्यात आले. केंद्रीय कारागृहातून त्याची सुटका झाली. सुटका झाल्यानंतर तो परस्पर नेपाळला गेला. नेपाळमधून काही महिन्यांनी तो स्वतःहूनच आपल्या घरी परत आला. मात्र, पुन्हा तो घरातून गायब झाला.
[read_also content=”पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी गड राखला! तिवसा नगरपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व कायम तर भाजपचा दारुण पराभव https://www.navarashtra.com/amravati/vidarbha/amravati/guardian-minister-yashomati-thakur-maintains-fort-congress-continues-to-dominate-tivasa-nagar-panchayat-nrvk-224732.html”]
काही महिन्यांपूर्वी तो केरळ राज्यातील थिसूर येथील मनोवैज्ञानिक केंद्रांमध्ये असल्याचे त्याच्या घरच्यांना समजले. त्याच्यावर सध्या मनोवैज्ञानिक केंद्रांमध्ये उपचार सुरू आहे. तसेच, तो उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले आहे. तो घरी परत यावा अशी त्याच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची आज भेट घेतली आहे.
[read_also content=”अमरावतीमधील शिवरायांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक प्रतिष्ठापना करा; भाजपची मागणी https://www.navarashtra.com/amravati/vidarbha/amravati/respectfully-install-the-statue-of-shivaji-maharaj-at-amravati-bjps-demand-nrvk-223810.html”]
यावेळी, पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी त्वरित पाऊल उचलत थिसुर येथील मनोवैज्ञानिक केंद्रातील डॉक्टर सुब्रमण्यम यांच्याशी चर्चा केली. तसेच, निरंजनला पुन्हा परत घरी आणण्याची परवानगी मिळविली. तसेच, निरंजनला परत घरी आणण्यासाठी निरंजनच्या कुटुंबियांना केरळात जाण्याची सर्व व्यवस्थाही पालकमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे, निरंजन आता पुन्हा एकदा आपल्या मातीत परतणार आहे. याबाबत निरंजनच्या कुटुंबियांनी पालकमंत्री ॲड. ठाकूर यांचे मनःपूर्वक आभार मानले आहे. तसेच, समाधान व्यक्त केले आहे.
Web Title: First nepal then kerala finally niranjan of bhatukali will return again to the soil of amravati arrangements made by guardian minister yashomati thakur nraa