राळेगणसिद्धी : राळेगणसिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जागे करण्यासाठी 1 जून रोजी सोमनाथ काशिद आंदोलन करणार आहेत(An agitation in Ralegan Siddhi on June 1 to Wake Up Anna Hazare).
घरगुती वापराच्या एलपीजी गॅसची दरवाढ, इंधनासह खाद्यतेलाची होत असलेली दरवाढ, त्यातच खाद्यान्नांची होत असलेली दरवाढ यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. महागाई विरोधात सर्वसामान्यांमध्ये मोठा आक्रोश आहे. असे असताना अण्णा हजारे शांत कसे काय आहेत, असा सवाल सोमनाथ काशीद यांनी केला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकायुक्ताच्या मुद्यावर राज्यातील महाविकास आघाडीला आंदोलनाचा इशारा दिला आहे. एकतर कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा, असे त्यांनी म्हटले आहे.
लोकायुक्त कायदा बनविण्याचं लेखी आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र, अडीच वर्षे उलटून देखील त्यावर काहीच होत नसल्याची खंत अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.
[read_also content=”लग्नानंतर वधू-वराने स्वत:ला पेटवून घेतलं आणि…. पाहा भयानक व्हिडिओ https://www.navarashtra.com/viral/bride-and-groom-set-themselves-on-fire-nrvk-280519.html”]
[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]
[read_also content=”एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]