Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पिंपरी बंद’मुळे उद्योगनगरीतील किमान 100 कोटींचे व्यवहार ठप्प 

  • By युवराज भगत
Updated On: Sep 09, 2023 | 09:06 PM
‘पिंपरी बंद’मुळे उद्योगनगरीतील किमान 100 कोटींचे व्यवहार ठप्प 
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : जालन्यातील मराठा समाजाच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील सर्वच प्रमुख्य बाजारपेठा बंद होत्या. कपडा मार्केट, किराणा, इलेक्ट्रिक आणि इलेक्र्ट्रॉनिक्स, फर्निचर आणि सराफ मार्केट बंद असल्याने किमान 100 कोटींची उलाढाल ठप्प झाली होती.

सकाळपासूनच बंदला उत्फूर्त प्रतिसाद

शनिवारी सकाळपासूनच बंदला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. पिंपरी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून डीलक्स चौक मार्गे, मेन बाजार पिंपरी या मार्गाने मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे दाखल झाला. या दरम्यानसकाळी सात ते सायंकाळ प्रयत्न सर्व प्रमुख्य बाजारपेठा बंद होत्या. यामध्ये निगडी, थरमॅक्स चौक, भोसरी, मोशी, वाकड, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, रावेत येथे शुकशुकाट होता.

आजच्या बंदमुळे व्यवहार ठप्प

पिंपरी शहरात मोबाईल, किराणा, कपडे आणि फर्निचरचे होलसेल आणि रिटेल मार्केट आहे. येथून दिवसाकाठी 70 ते 80 कोटीरुपयांची उलाढाल होत असते. त्यातच गौरी गणपती सण जवळ आले आहेत. आज शनिवार अनेकांना सुट्टी असल्याने खरेदीचा बेत असतो. आजच्या बंदमुळे व्यवहार ठप्प झाले होते.

शहरात सराफ (ज्वेलर्स) बाजारपेठ मोठी आहे. शहरात अनेक छोटे-मोठे सराफ असून दिवसाकाठी 30 ते 35 कोटी रुपयांची उलाढालहोत असते. आजच्या बंदमध्ये सराफ व्यवसायिकांनी पाठींबा दर्शविला होता. त्यामुळे एवढी मोठी उलाढाल ठप्प झाली होती.

शहरात हॉटेल व्यवसाय मोठा आहे. आज शनिवार असल्याने नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात जेवणासाठी बाहेर पडत असतो. यात मोठीआर्थिक उलाढाल होत असते. याच सोबत भाजी व्यवसाय हि आज बंद होता. यातील हि मोठी उलाढाल ठप्प झाली होती.

आज पिंपरी चिंचवड बंद पुकारण्यात आले होते. या बंदला पिंपरीतील व्यापाऱ्यांचा पाठींबा आहे. पिंपरीत होलसेल आणि रिटेलचे मोठेमार्केट असून दररोज 70 ते 75 कोटींची उलाढाल होत असते. – श्रीचंद आसवानी, (पिंपरी झुलेलाल मर्चंड असोसेट्सचे अध्यक्ष)

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेच्या निषेर्धात पुकारण्यात आलेल्या बंदला सराफ असोसिएशनने पाठिंबादर्शवत दुकाने बंद ठेवली होती. आमचा मराठा आरक्षणसाठी पाठिंबा आहे. शहरात सराफ व्यवसायातून दररोज 30 ते 35 कोटींचेव्यवहार होतात. – दिलीप सोनिगरा, (उपाध्यक्ष-सराफ असोसिएशन)

Web Title: At least 100 crore transactions in industrial city have come to a standstill due to pimpri bandh nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2023 | 09:06 PM

Topics:  

  • Pimpri-Chinchwad News

संबंधित बातम्या

PCMC News: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्याने लोकसभेला फटका बसला: अजित पवार
1

PCMC News: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्याने लोकसभेला फटका बसला: अजित पवार

पिंपरी-चिंचवडमध्ये आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण; 42 वर्षीय व्यक्तीला लागण
2

पिंपरी-चिंचवडमध्ये आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण; 42 वर्षीय व्यक्तीला लागण

Pimpri-Chinchwad : जाहिराती लावल्या तर परवाने रद्द होणार; महापालिकेचा आक्रमक पवित्रा
3

Pimpri-Chinchwad : जाहिराती लावल्या तर परवाने रद्द होणार; महापालिकेचा आक्रमक पवित्रा

बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी पुनर्वसन झालेल्या घरांच्या दुबार पुनर्वसनाचा SRA चा घाट; मदतीला महानगरपालिका!!”
4

बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी पुनर्वसन झालेल्या घरांच्या दुबार पुनर्वसनाचा SRA चा घाट; मदतीला महानगरपालिका!!”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.