शहरात उभारण्यात येणारे नाट्यसंकुल रंगकर्मींसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. औद्योगिक ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडला सांस्कृतिक नगरीचा नवा दर्जा मिळवून देण्यास हे संकुल महत्त्वाची भूमिका बजावेल.
महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाकडून शहरातील नागरिकांनी घाबरुन जावू नये. कोविड पॉझिटिव्ह आलेला रुग्णावर घरीच उपचार सुरु आहेत. त्याची तब्येत देखील ठीक आहे.
मुंबई, पुण्यासह सातारा जिल्ह्यातील मायणी येथे ढगफुटीसद़ृश पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र एकच हाहा:कार उडाला असून, मल्हारपेठ-पंढरपूर महामार्गासह अनेक रस्ते अक्षरश: पाण्याखाली गेल्याचे पाहिला मिळाले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या…
पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी आग लागलेली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वाढदिवसाच्या कॅंडल बनवणाऱ्या आणि फटाक्यांच्या गोदामाला ही आग लागली आहे. या भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या…
पिंपरी : किवळे दुघर्टनेनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील १७४ अनधिकृत जाहिरात फलक जमीनदोस्त करण्यात आले आहेत. शहरात फक्त १ हजार १३६ जाहिरात फलक अधिकृत आहे. यापुढील काळात शहरात अनिधकृत फलक आढळल्यास फलक…
पिंपरी : जालन्यातील मराठा समाजाच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील सर्वच प्रमुख्य बाजारपेठा बंद होत्या. कपडा मार्केट, किराणा, इलेक्ट्रिक आणि इलेक्र्ट्रॉनिक्स, फर्निचर आणि सराफ मार्केट बंद असल्याने किमान 100 कोटींची उलाढाल ठप्प झाली होती. सकाळपासूनच बंदला उत्फूर्त प्रतिसाद शनिवारी सकाळपासूनच बंदला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. पिंपरी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून डीलक्स चौक मार्गे, मेन बाजार पिंपरी या मार्गाने मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे दाखल झाला. या दरम्यानसकाळी सात ते सायंकाळ प्रयत्न सर्व प्रमुख्य बाजारपेठा बंद होत्या. यामध्ये निगडी, थरमॅक्स चौक, भोसरी, मोशी, वाकड, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, रावेत येथे शुकशुकाट होता. आजच्या बंदमुळे व्यवहार ठप्प पिंपरी शहरात मोबाईल, किराणा, कपडे आणि फर्निचरचे होलसेल आणि रिटेल मार्केट आहे. येथून दिवसाकाठी 70 ते 80 कोटीरुपयांची उलाढाल होत असते. त्यातच गौरी गणपती सण जवळ आले आहेत. आज शनिवार अनेकांना सुट्टी असल्याने खरेदीचा बेत असतो. आजच्या बंदमुळे व्यवहार ठप्प झाले होते. शहरात सराफ (ज्वेलर्स) बाजारपेठ मोठी आहे. शहरात अनेक छोटे-मोठे सराफ असून दिवसाकाठी 30 ते 35 कोटी रुपयांची उलाढालहोत असते. आजच्या बंदमध्ये सराफ व्यवसायिकांनी पाठींबा दर्शविला होता. त्यामुळे एवढी मोठी उलाढाल ठप्प झाली होती. शहरात हॉटेल व्यवसाय मोठा आहे. आज शनिवार असल्याने नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात जेवणासाठी बाहेर पडत असतो. यात मोठीआर्थिक उलाढाल होत असते. याच सोबत भाजी व्यवसाय हि आज बंद होता. यातील हि मोठी उलाढाल ठप्प झाली होती. आज पिंपरी चिंचवड बंद पुकारण्यात…
शिवरायांचे विचार जुने झाले, हे असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केले होते. तर, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी शिवरायांनी माफीनामा लिहून दिला होता, असे विधान केले होते.…