Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाग्यश्री आत्राम यांनी हाती घेतली तुतारी; प्रवेश करताच वडिलांना दिला इशारा

अहेरी विधानसभेत बाप विरुद्ध लेक असा सामना रंगण्याची शक्यता आहे. शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर भाग्यश्री आत्राम यांनी थेट बापालाच धमकी दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 12, 2024 | 05:18 PM
भाग्यश्री आत्राम यांनी हाती घेतली तुतारी; प्रवेश करताच वडिलांना दिला इशारा
Follow Us
Close
Follow Us:

गडचिरोली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मुलीने ‘दादां’ना मोठा धक्का दिला आहे. भाग्यश्री आत्राम यांनी ‘घड्याळ’ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन ‘तुतारी’ फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्या रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे अहेरी विधानसभेत बाप विरुद्ध लेक असा सामना रंगण्याची शक्यता आहे. शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर भाग्यश्री आत्राम यांनी थेट बापालाच धमकी दिली आहे.

अजित पवार गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केलाय. पक्षप्रवेशानंतर भाग्यश्री आत्राम चांगल्याच आक्रमक झाल्यात.. धर्मरावबाबा शेर तर मी शेरनी आहे.. माझ्या कार्यकर्त्याला हात लावाल तर कापून टाकणार, असा गंभीर इशारा भाग्यश्री आत्रामांनी धर्मरावबाबांना दिला आहे.

अजित पवार यांनी दिला होता इशारा

वस्तादने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गडचिरोलीत अत्रामांच्या मुलीला इशारा दिला होता. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांच्या मुलीला शरद पवार गटातर्फे तिकीट देण्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी इशारा दिला होता.

कोण आहेत भाग्यश्री आत्राम हलगीकर?

– भाग्यश्री आत्राम या कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या ज्येष्ठ कन्या
– पुण्यातील भारती विद्यापीठातून बीएससी पदवी
– बेळगावच्या ऋतुराज हलगेकर यांच्याशी विवाहबद्ध
– २०१३ मध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद
– २०१९ पासूनच बापलेकीत राजकीय वैर

एक गेलं तरी संपूर्ण कुंटुंब माझ्यामागे : धर्मरावबाबा आत्राम

धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, जे माझ्या खुर्चीवर बसण्याच स्वप्न पाहतील त्यांना बाजूला करण्याचे काम मी करणार आहे. मी या भूमीतील गरीब आणि श्रीमंत अशा सर्व लोकांना सर्वांना समान न्याय दिला आहे. मी सतत काम करत आलो आहे. आता हे मध्येच येऊन हे अशा प्रकारचे वातावरण तयार करत असतील तर त्यांना वाट लावायचे काम आपल्याला करायचे आहे. मी इमाने इतबारे काम केले. 50 वर्षे या भूमीचे रक्षण करण्याचे काम केले आहे. शेवटचा श्वास असेपर्यंत मी काम करत राहणार आहे. एक गेला तरी कुटुंबाची संपूर्ण फौज आज माझ्यामागे उभी आहे.

Web Title: Babarao atrams daughter warn him not to mess with her worker she wont spare anyone nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2024 | 05:16 PM

Topics:  

  • NCP Sharad Pawar

संबंधित बातम्या

शरद पवारांना मोठा धक्का! ‘हा’ बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
1

शरद पवारांना मोठा धक्का! ‘हा’ बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Manikrao Kokate Video: “दादांनी ‘माणिक’ नाहीतर ‘सागरगोटा’…”; शरद पवार गटाची रमी प्रकरणावरून कोकाटेंवर सडकून टीका
2

Manikrao Kokate Video: “दादांनी ‘माणिक’ नाहीतर ‘सागरगोटा’…”; शरद पवार गटाची रमी प्रकरणावरून कोकाटेंवर सडकून टीका

Mumbai : महायुती सरकारवर टीका, रोहित पवारांनी सगळ्यांना घेरलं !
3

Mumbai : महायुती सरकारवर टीका, रोहित पवारांनी सगळ्यांना घेरलं !

महापालिका निवडणुकीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी सक्रिय; कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
4

महापालिका निवडणुकीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी सक्रिय; कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.