Akshay Shinde Encounter: '... त्यामुळे आम्हाला केस लढवायची नाही'; अक्षयच्या पालकांची भूमिका, कोर्टात काय घडलं?
बदलापूर: बलदापुर येथील एक शाळेतील मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यातील जनता संतप्त झाली आहे. त्या प्रकरणातील शाळेत काम करणाऱ्या अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. मात्र अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला होता. बदलापुरातील दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदेला ताब्यात घेण्यात आले होते. पोलीस कोठडीदरम्यान त्याने पोलिसांवर हल्ला केला. पुढे प्रतिहल्ल्यात त्याचा एन्काऊंट झाला असे म्हटले जात होते. आता अक्षयच्या पालकांनी आपल्याला केस लढायची नसल्याचे सांगितले आहे.
आम्हाला आमच्या मुलाच्या एन्काऊंटर प्रकरणाची केस लढवायची नसल्याची भूमिका अक्षयच्या पालकांनी घेतली आहे. आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. मात्र आम्हाला ही धावपळ आता जमत नाही असे म्हणत अक्षयच्या पालकांनी केस लढण्यास नकार दिला आहे. यावर आता उद्या मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मुंबई हायकोर्ट आता यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
अक्षय शिंदेचा एन्काऊंट बनावट होता आणि या प्रकरणात त्या 5 पोलिसांवर काय कारवाई केली याबाबत हायकोर्टात सुनावणी सुरू होती. मात्र सुनावणी संपताना अक्षयच्या पालकांनी आम्हाला ही केस लढवायची नाही अशी विनंती कोर्टासमोर केली आहे. त्यावर आता कोर्ट काय निर्णय देणार हे पहावे लागणार आहे. अक्षयच्या पालकांनी असे भूमिका घेलत्यावर तुम्ही असा निर्णय का घेत आहात असे कोर्टाने विचारले? यावर म्हणतात आम्हाला ही धावपळ जमत नाही. आमच्याकडे राहायला जागा नाही. त्यामुळे आम्हाला न्यायालयीन लढा द्यायचा नाही अशी भूमिका पालकांनी कोर्टासमोर मांडली.
नेमके प्रकरण काय?
मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणात पाच पोलिस अधिकाऱ्यांना दोषी ठरवत त्यांच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. अक्षय शिंदे हा बदलापूर येथील शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आरोपी होता. मात्र, चौकशी अहवालात हे स्पष्ट झाले की, त्याच्या बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स सापडले नाहीत. यामुळे या एन्काऊंटरच्या सत्यतेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत आणि न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरत कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
बदलापूर येथील शाळेतील दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला. तळोजा कारागृहातून नेत असताना मुंब्रा बायपास य़ाठिकाणी त्याने कारमधील पोलिसाची बंदूक हिसकावून पोलिसांवरच गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यात पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्यांच्यावर गोळीबार केला, यातच त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा: Akshay Shinde News Update; अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात ठाण्यातील मॅजिस्ट्रेटने चौकशी अहवाल सादर केला चौकशी समितीने दाखल केलेल्या अहवालात मात्र बंदुकीवर अक्षयच्या हातांचे ठसे आढळलेच नाहीत, असं म्हटलं आहे. क्षयला तळोजा कारगृहातून दुसऱ्या कारागृहात नेत असताना मुंंब्रा बायपासवर वाटेत त्याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यी झाला. अक्षय शिंदेंने पोलिसांची बंदूक हिसकावल्यामुळे पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळी झाडल्याचा दावा पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आला होता. पण पोलिसांचा हा दावा न्यायालायात टिकला नाही.