Bangladeshi migrant woman takes advantage of Ladki Bhain scheme
मुंबई : महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना अल्पावधीमध्ये लोकप्रिय झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेचा मोठा प्रचार करण्यात आला. मात्र निवडणुकीनंतर मंत्री आदिती तटकरे यांनी अर्जाची छाननी सुरु केली आहे. निकक्षांमध्ये अपात्र ठरत असलेल्या महिलांवर आता अर्ज बाद होण्याची टांगती तलवार आहे. मात्र एका बांगलादेशी महिलेने योजनेचा लाभ घेतला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
महाराष्ट्रातील अपात्र महिलांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार का नाही यावरुन महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र दुसऱ्या देशातील महिलेने या योजनेचा लाभ घेतला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बांगलादेशी महिलने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आलं आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून 5 बांगलादेशी नागरिकांसह एका दलालाला सु्द्धआ अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांपैकी एका महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मीडिया रिपोर्टनुसार, बांगलादेशी महिलेने महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. बांगलादेशी नागरिक व दलाल यांना अटक करण्यात आले असून यातील एका महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. दक्षिण मुंबईतील कामठीपुरा परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बनावट कागदपत्र तयार करुन या बांगलादेशी महिलेने योजनेचा लाभ घेतला आहे.
बांगलादेश भारत बॉर्डरवरुन अनेक बांदलादेशी भारतामध्ये येत आहेत. बांगलादेशमध्ये अर्थव्यवस्थेचे दिवाळे निघाले असून नोकरीसाठी अनेकजण घुसखोरी करत आहे. यामुळे देशातील गुन्हेगारी वाढत असून देशाच्या सीमाभागांबाबत काळजी व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी बॉलीवुड अभिनेता सैफ अली खान याच्यावर देखील हल्ला करणारा व्यक्ती बांगलादेशी असल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला देखील बांगलादेशी आहे.
भारतामध्ये घुसखोरी करणारे बांगलादेशी हे दलालाच्या मदतीने भारतामध्ये प्रवेश करतात. तसेच बनावट कागदपत्र व ओळखपत्र तयार केली जातात. याद्वारे ते भारताचे नागरिक असल्याचा बनाव करतात आणि देशामध्ये वावर करतात. मात्र यामुळे देशातील कायदा व व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याच बनावट कागदपत्रांचा वापर करुन राज्य सरकारच्या महत्त्वकांशी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कामाठीपुरा परिसरातून एका स्थानिक दलालालाही पोलिसांनी अटक केलेली आहे. एकूण 6 जमांवर ही अटकेची कारवाई करण्यात आली. पोलिसांनी जी प्राथमिक चौकशी केली त्यामध्ये जी महिला आहे तिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचता लाभ मिळाल्याचं उघड झालं आहे. गेल्या महिन्या-दीड महिन्यात मुंबईत गुन्हे शाखेने जवळपास 30 हून अधिक गुन्हे दाखल केले असून सुमारे 50 बांगलादेशी नागरिकांना आत्तापर्यंत अटक केलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट कागदपत्र बनवून देण्यामध्ये ज्या एजंटने मदत केली. त्याच्याविरोधातही वेगवेगळ्या कलमाअंतर्गंत गुन्हा दाखल केला जाईल. मात्र ज्या बांगलादेशींना आत्तापर्यंत अटक केली जाते, त्यांना स्थानिक पातळीवर मदत करणारे काही दलाल अथवा एजंट हेही सापडत आहेत. त्याअनुषंगाने त्यांना ताब्यात घेतलं जात आहे, अटकेची कारवाई केली जात आहे.