लाडकी बहीण योजनेतील केवायसी प्रक्रियेची अंतिम मुदत आता काहीच तासांवर आली असताना, अजूनही सुमारे १ कोटी महिलांचे केवायसी बाकी असल्याने लाभार्थ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.
Aditi tatkare News: महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी सर्वच लाडक्या बहिणींना महत्त्वाची माहिती दिली आहे. या माहितीनुसार आता राज्यभरातील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लाडकी बहीणच्या लाभार्थ्यांपैकी 26 लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबवण्यात आले होते. या लाभार्थ्यांची ओळख निश्चित झाल्यानंतर 20 लाख लाभार्थ्यांचे पैसे सुरू करण्यात आले. मात्र, अद्यापही सहा लाख लाभार्थ्यांची ओळख पटलेली नाही.
महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा परिणाम झाला असून खर्च वाढला. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून एका वर्षात 43 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेवरून विरोधकांकडून अनेकदा जोरदार निशाणा साधला जात आहे. त्यातच अनेक पुरुषांनी या योजनेतून लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
सध्या ई-केवायसीद्वारे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांचा शोध सुरु होता. यात महिलेच्या वडिलांसह पतीच्या कमाईचीही खातरजमा केली जात आहे.
राज्य कर्जात बुडाले आहे. कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. कापूस खरेदीसाठी सरकारजवळ पैसा नाही. मात्र, महायुती सरकारमधील पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांना वाटण्यासाठी ५ कोटी आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य करत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणींचा व्यत्यय येत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. ग्रामीण भागातील महिलांना कनेक्टिव्हिटीच्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया दरवर्षी करावी लागणार आहे. या प्रक्रियेचे पालन सर्व लाभार्थींना अनिवार्य करण्यात आले आहे.
Ladki Bahin Yojana September installment : लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आजपासून देण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
काही महिला घरातील सुशिक्षित मुला-मुलींच्या माध्यमातून मोबाईलद्वारे केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या केवायसीसाठी शासनाकडून उपलब्ध असलेले पोर्टल वा सर्व्हर सातत्याने बंद पडत आहे.
लाडकी बहीण योजनेत अनेकांनी खोटी कागदपत्रे देऊन लाभ उचलल्याचे उघड झाले. यामुळे महिला व बालविकास विभागाद्वारे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पुन्हा सर्वेक्षण करण्यात येत आहे.
Ladki Bahin Yojana News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना मिळणारे हप्ते अधिक सुलभ, सुकर व पारदर्शक व्हावेत यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावे, असे आवाहन मेघना बोर्डीकर यांनी केले…
मराठवाड्यात लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर फसवे अर्ज सापडले. वयाच्या मर्यादेचा भंग आणि एकाच घरातील अनेक लाभार्थी यामुळे १,२४,९३७ महिलांचे अर्ज बाद झाले. अर्ज बाद झालेल्या महिलांच्या खात्यात यापुढे पैसे…