दिवाळ सणाला सुरुवात झाली आहे. आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनोत्रयादशी दिवाळीच्या मुहूर्तावर चौफेर बाजारपेठा सजल्या आहे, सणाच्या पार्श्वभुमिवर नव्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी होताना दिसत आहे. पण सणासुदीच्या दिवसात सलग पाच दिवस सरकारी सुट्ट्या असल्याने बॅंका बंद असणार आहे.
तरी तुम्हाला बॅंकेचे व्यवहार करायचे असल्यास आता तुम्हाला सलग पाच दिवस वाट बघावी लागणार आहे. कारण 22 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर दरम्यान बॅंकेला सुट्ट्या असणार आहेत. 22 ऑक्टोबर म्हणजे आज चौथा शनिवार असल्याने बॅंका बंद असणार आहे. तर उद्या म्हणजे रविवारच्या सुट्टीमुळे बॅंक बंद आहे.
24 ऑक्टोबर म्हणजे लक्ष्मीपूजन . हा दिवाळ सणातील सर्वात मोठा दिवस. या दिवशी बॅंकेला सरकारी सुट्टी घोषित करण्यात आली आहे. म्हणून सोमवारी म्हणजेचं आठवड्याच्या पहिल्याचं दिवशी बॅंक बंद असणार आहे. मंगळवारी महाराष्ट्रात बॅंका सुरु असणार आहेत.