Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holidays Calendar : होळीची सरकारी सुट्टी ३ की ४ मार्चला? महाराष्ट्रात ‘या’ दिवशी बँका राहणार बंद!

RBI ने मार्च 2026 साठी बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली असून होळीच्या आसपास विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या तारखांना बँका बंद राहणार आहेत. होळी निमित्त अनेक राज्यांत बँका बंद असतील.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 28, 2026 | 04:34 PM
bank holiday list

bank holiday list

Follow Us
Follow Us:

Holidays Calendar : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मार्च २०२६ साठी बँक सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक सणांमुळे बँक शाखा कोणत्या तारखांना बंद राहतील याचा समावेश आहे. ही यादी महत्त्वाची आहे कारण राज्यांमध्ये सुट्ट्या एकसारख्या नसतात. काही सण फक्त देशाच्या काही भागांमध्येच सुट्टी म्हणून पाळले जातात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सुट्ट्यांचा पॅटर्न हा वेगवेगळा असतो. जर या आठवड्यात तुमचंही बँकेशी संबंधित काही काम असेल, तर तुम्ही तुमच्या शहर आणि राज्यानुसार होळीची सुट्टी कोणत्या दिवशी असेल आणि बँका कधी सुरू राहतील याची योग्य तारीख तपासून नक्की पाहा.

महायुद्धाचा भडका! सोमवारी शेअर बाजार कोसळणार? गुंतवणूकदारांमध्ये भितीचं वातावरण

होळीच्या आसपास बँकांच्या सुट्ट्या

होळी २०२६ रंगांचा प्रमुख सण ४ मार्च  म्हणजे बुधवार रोजी येतो. परंतु RBI च्या यादीनुसार, अनेक शहरे आणि राज्यांमध्ये होळीशी संबंधित वेगवेगळे दिवस सुट्ट्या म्हणून घोषित केले जातात.

दरम्यान, सोमवार, २ मार्च २०२६ रोजी कानपूर आणि लखनौसारख्या काही शहरांमध्ये होलिका दहनासाठी बँका बंद राहतील. इतर बहुतेक ठिकाणी बँका नेहमीप्रमाणे काम करतील. त्यांना कोणतीही सुट्टी असणार मिळणार नाही.
मंगळवार, ३ मार्च २०२६ रोजी, होळी म्हणजेच धुळंदीनिमित्त अनेक प्रमुख शहरांमध्ये बँक शाखा बंद राहतील. या शहरांमध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता, पाटणा, रांची, भोपाळ, डेहराडून, गुवाहाटी, हैदराबाद, नागपूर, पणजी, बेलापूर आणि विजयवाडा यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी बँका बंद राहतील त्यामुळे रहिवाशांनी बँकेत काही काम असल्यास त्यांच पूर्वीच नियोजन करावं.
४ मार्च २०२६ (बुधवार) रोजी देशभरात होळी साजरी केली जाते. या दिवशी उत्तर आणि मध्य भारतातील अनेक भागात बँका बंद राहतील. नवी दिल्ली, अहमदाबाद, लखनौ, कानपूर, पटना, रांची, चंदीगड, शिमला, जम्मू, रायपूर, भुवनेश्वर, अगरतळा, इटानगर, शिलाँग आणि इंफाळ येथे बँका बंद राहतील.

मार्चमध्ये अनेक सुट्ट्या

होळीनंतरही, मार्चमध्ये अनेक सुट्ट्या असतात
१३ मार्च – छपचार कुट (काही राज्यांमध्ये)
१७ मार्च – शब-ए-कद्र (जम्मू/काश्मीर)
१९ मार्च – गुढी पाडवा, उगादी प्रकारचे सण
२०-२१ मार्च – ईद-उल-फित्र / ईद
२६-२७ मार्च – राम नवमी
३१ मार्च – काही ठिकाणी स्थानिक सुट्टी (काही राज्यांमध्ये RBIने ती रद्द केली आहे.)
या सुट्ट्यांचा अर्थ असा नाही की सर्व बँकिंग सेवा बंद राहतील. ऑनलाइन बँकिंग (यूपीआय, मोबाइल/नेट बँकिंग, एटीएम) सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. डिजिटल व्यवहार करणाऱ्यांसाठी हे सोयीचे असेल. तथापि, जर तुम्हाला भौतिक सेवांची आवश्यकता असेल. जसे की चेक डिपॉझिट, केवायसी अपडेट्स, ड्राफ्ट्स तर आधीच नियोजन करा आणि सुट्टीपूर्वी तुमचे काम पूर्ण करा.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ व्या वेतन आयोगामध्ये बदलणार ‘ही’ योजना; जाणून घ्या…

Web Title: Rbi releases march 2026 bank holiday list holi to impact banking services

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • Bank Employee
  • Bank Holiday
  • Bank Holidays
  • RBI news

संबंधित बातम्या

RBI Digital Rupee: इंटरनेट आणि बँक खात्याशिवाय होणार व्यवहार! काय आहे RBI चा ‘डिजिटल रुपया’? UPI पेक्षा कसा आहे भारी?
1

RBI Digital Rupee: इंटरनेट आणि बँक खात्याशिवाय होणार व्यवहार! काय आहे RBI चा ‘डिजिटल रुपया’? UPI पेक्षा कसा आहे भारी?

Forex Reserves Update: भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! परकीय चलन साठ्यात मोठी वाढ, सरकारी तिजोरी 674.19 अब्ज डॉलर्सवर
2

Forex Reserves Update: भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! परकीय चलन साठ्यात मोठी वाढ, सरकारी तिजोरी 674.19 अब्ज डॉलर्सवर

Inflation Rate: महागाई ठरतेय मानेवरचं भूत! 16 महिन्यात पहिल्यांदा RBI च्या नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता
3

Inflation Rate: महागाई ठरतेय मानेवरचं भूत! 16 महिन्यात पहिल्यांदा RBI च्या नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.