मनोज जरांगेंच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक; घरात घुसून महिलेला शिवीगाळ करत मारहाण-0
बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे बीडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मस्साजोगला जाऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यासोबतच त्यांनी ग्रामस्थांसोबत चर्चादेखील केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यात असलेल्या गंगाधर काळकुटे यांच्या गाडीने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. जरांगे हे बीडच्या दाऱ्यावर असताना एक घटना घडली आणि त्यानंतर आता गुन्हादेखील दाखल झाला आहे.
गंगाधर काळकुटे यांची गाडी मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यात होती. या गाडीने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. जरांगेंच्या ताफ्यात गंगाधर काळकुटे यांची गाडी होती आणि या गाडीने एका दुचाकीला धडक दिली. ही घटना पाटोदा तालुक्यातील कचारवाडी गावानजीक घडली होती. यात दुचाकीवरील एक महिला आणि तिचा मुलगा धडकेनंतर खाली पडले. यावेळी शाब्दिक चकमक झाली आणि वाद तिथेच थांबला. मात्र, रात्री त्याच महिलेच्या घरात घुसून आमच्या ताफ्यातील गाडीला का अडवलेस म्हणून तिला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली.
दरम्यान, याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांत गुन्हा देखील दाखल झाला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. पोलिस प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. काही दिवसांपूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली. आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. हेच नाही तर सातत्याने धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मनोज जरांगे पाटील हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना दिसले आहेत.
घरात घुसून महिलेला मारहाण
दरम्यान, ही घटना पाटोदा तालुक्यातील कचारवाडी येथे घडली. मात्र, हे प्रकरण तिथंच मिटल्यानंतर मनोज जरांगे यांच्या ताफ्यातील कार चालकानं सायंकाळी घरात घुसून महिलेला मारहाण केली. ताफ्यातील गाडीला का अडवलेस असा जाब विचारत या महिलेला घरात घुसून काठीनं मारहाण करण्यात आल्याचा आरोप, महिलेच्या नातेवाईकांनी केला. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.