Manoj Jarange narayangad live : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावर दसरा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी हातामध्ये सलाईन असून देखील मराठा समाजाला संबोधित केले. मराठा समाजाने मोठी गर्दी केली.
मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे यांनी काहीतरी जबाबदारी द्या अशी मागणी केली. यावर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याच्या मागणीवर आता लग्नापर्यंत वाद आला आहे. लक्ष्मण हाकेंच्या टीकेवर मनोज जरांगे पाटलांनी भाष्य केले.
राज्य शासनाने कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीच्या प्रमाणपत्रांसाठी अर्जदारांकडून प्राप्त अर्जांची तपासणी करण्यासाठी गावपातळीवर समित्या स्थापन केल्या आहेत.
जालना: ओबीसींच्या मुंबईवरील मोर्चाच्या इशाऱ्यानंतर मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारला इशारा दिला आहे की “आमच्या जीआरला धक्का लागला तर मोठं आंदोलन उभं करू”.
मराठा आंदोलनादरम्यान पाच लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान झालेल्या आंदोलकांवरील कारवाई मागे घेण्याचा निर्णय झाल्याचे भाजप मंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी जाहीर केले आहे.
इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्यामुळे, हैदराबाद गॅझेटमधील रेकॉर्ड वापरण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच प्रमाणपत्र दिले जाईल. त्यामुळे यामुळे ओबीसी वर्गाला कोणतेही नुकसान होणार नाही.
Maratha Reservation : मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे उपचारानंतर आता अंतरवलीमध्ये दाखल होणार आहेत. त्यापूर्वी कुणबी प्रमाणपत्राबाबत यांनी नवा अल्टीमेटम दिला आहे.
केवळ राजकीय संघर्षाने आरक्षणासारखे ज्वलंत प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी संवेदनशील आणि व्यावहारिक धोरणांची गरज असते. या पार्श्वभूमीवर जाहीर केलेली आर्थिक मदत हे छोटेसे पण महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे
याच पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यातील सर्व प्रमुख दैनिकांच्या पहिल्या आणि दुसऱ्या पानावर “देवाभाऊ” अशा शीर्षकाच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या. मात्र, या जाहिरातींमध्ये कोणताही सोर्स नमूद करण्यात आला नाही.
राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
मनोज जरांगे पाटील हे उपोषण सोडल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारच्या जीआरवर टीका करणाऱ्यांवर टीकास्त्र डागले.
जवळपास पाच दिवस मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक मुंबईत ठाण मांडून होते. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या उपोषणाविरोधात आणि त्यांच्या मागण्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती.
खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारने काढलेल्या मराठा आरक्षणावरील जीआरवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर संयम दाखवल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. मागण्या मान्य केल्यानंतर सरकारकडून हैदराबाद गॅझेटसंदर्भात जीआर काढण्यात आला.