(फोटो सौजन्य-AI एआय)
सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालयाची दिशाभूल करून खोटे व बनावट दस्तऐवज सादर केल्याप्रकरणी भंडारा पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शैलेश कृष्णा खोब्रागडे (४६, रा. लाखांदूर) आणि राजेंद्र नारायण नागदेवे (६३, रा. तुळशीनगर, खात रोड, भंडारा) अशी आरोपींची नावे आहेत.
‘महाराष्ट्र रूरल एज्युकेशन सोसायटी’ या न्यासाच्या एका प्रकरणात सहाय्यक धर्मादाय आयुक्तांच्या मंजुरी आदेशानुसार विवादित दस्तऐवजाची पाहणी करण्यात आली. धर्मादाय कार्यालयातील आवक जावक विभागाचा मूळ शिक्का आणि दस्तऐवजावरील शिक्का यात तफावत आढळून आली. तसेच आवक-जावक लिपीक तुळसा गणपत दोडके यांच्या मूळ स्वाक्षरीशी दस्तऐवजावरील स्वाक्षरी जुळत नसल्याचा अहवाल अधीक्षकांकडे सादर करण्यात आला. कार्यालयाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने २०११ ते २०२४ या कालावधीतील लेखापरीक्षण अहवालाची
डिजीटल अरेस्टच्या नावाखाली ४.५० लाखांची फसवणूक
भंडारा. मोबाइलवर संपर्क साधून घरातच नजरकैदेत ठेवल्याचे भासवून आणि मनी लॉड्रिगची खोटी भीती घालून सायबर भामट्यांनी एकाची ४ लाख ५५ हजार २०० रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भंडारा सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २२ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध मोबाइल क्रमांकांवरून आरोपींनी फिर्यादीशी संपर्क साधला. फिर्यादीला घरीच नजरकैदेत ठेवून त्यांच्याविरुद्ध मनी लॉड्रिंगची केस दाखल असल्याचे सांगण्यात आले. अटकेची बनावट कागदपत्रे व्हॉट्सअॅपवर पाठवून विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर आरटीजीएसच्या माध्यमातून आरोपींनी सांगितलेल्या बैंक खात्यात ४ लाख ५५ हजार २०० रुपये भरण्यास भाग पाडून ही फसवणूक केली. बनावट पोहोच पावती तयार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालयाचे निरीक्षक मोरेश्वर रघुनाथ मातरे (५४) यांनी दिलेल्या अहवालावरून गुन्हा नोंदवण्यात आला.
💡 Frequently Asked Questions
प्रश्न 1: भंडाऱ्यात बनावट दस्तऐवज प्रकरणात काय घडले?
उत्तर: महाराष्ट्र रूरल एज्युकेशन सोसायटीच्या प्रकरणातील दस्तऐवजावर असलेला शिक्का आणि स्वाक्षरी मूळ नोंदींशी जुळत नसल्याचे आढळले. या प्रकरणात शैलेश कृष्णा खोब्रागडे आणि राजेंद्र नारायण नागदेवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रश्न 2: डिजिटल अरेस्टच्या नावाखाली किती रुपयांची फसवणूक झाली?
उत्तर: या प्रकरणात सायबर भामट्यांनी एका व्यक्तीची 4,55,200 रुपयांची फसवणूक केली. मनी लॉन्ड्रिंगची खोटी केस आणि अटकेची भीती दाखवून आरटीजीएसद्वारे पैसे हस्तांतरित करण्यास भाग पाडण्यात आले.
प्रश्न 3: डिजिटल अरेस्टच्या फसवणुकीपासून कसे सावध राहावे?
उत्तर: फोन किंवा व्हिडिओ कॉलवर पोलिस असल्याचा दावा करून कोणीही पैसे मागितल्यास पैसे पाठवू नका. अटकेची कागदपत्रे किंवा व्हॉट्सअॅप संदेशांवर आंधळा विश्वास ठेवू नका. संशयास्पद सायबर फसवणुकीची तक्रार 1930 या हेल्पलाइनवर किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर नोंदवा.






