Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील भावेश भिंडेला अटक; मुंबई क्राईम ब्रॅंचचे मोठे यश, अनेक दिवसांपासून पोलिसांना देत होता गुंगारा 

  • By युवराज भगत
Updated On: May 16, 2024 | 09:21 PM
Bhavesh Bhinde in Ghatkopar Hoarding Fall Case

Bhavesh Bhinde in Ghatkopar Hoarding Fall Case

Follow Us
Close
Follow Us:
Bhavesh Bhinde Arrested : मुंबईमध्ये घाटकोपर येथे महाकाय होर्डींग पडून मोठी दुर्घटना घडल्यानंतर मुंबईसह राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेने मुंबई प्रशासनासह राज्यातील प्रमुख शहरांचे प्रशासन खडबडून जागे झाले होते. त्यानंतर अनेक शहरांमध्ये अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. आता या घटनेला जबाबदार असणाऱ्या प्रमुख आरोपीला अटक करण्यात आली आहे.
घाटकोप होर्डिंग दुर्घटनेत एकूण 17 जणांचा मृत्यू
घाटकोपर होर्डींग दुर्घटनेतील प्रमुख आरोपी भावेश भिंडेवर मुंबई पोलिसांकडून कलम 304, 305 चा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेट्रोल पंपवर हा अनधिकृत होर्डिंग पडल्यानंतर एकूण 17 जणांचा मृत्यू झाल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये मुंबई क्राईम ब्रॅंचसह एकूण 60 टीम भावेश भिंडेचा तपास करीत होते.
मुंबईसह राज्यातील प्रशासनसुद्धा खडबडून जागे
घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेने मुंबई प्रशासनासह राज्यातील प्रशासनसुद्धा खडबडून जागे झाले आहे. आता यामधील मृतांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. परंतु, या सर्व घटनेला जबाबदार असलेला या होर्डींग कंपनीचा मालक भावेश भिंडे अजूनही फरार आहे. आता हा भावेश भिंडे पोलिसांना सापडला नसल्याने भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी याला भगोडा घोषित करण्याची मागणी केली आहे. या महाकाय होर्डिंगची निर्मिती करणारा भावेश भिंडे आहे तरी कोण हे आपण जाणून घेणार आहोत.
घाटकोपरमधील होर्डींगची नोंद लिम्का बुक अॉफ रेकॉर्डमध्ये झाली होती. परंतु, हजारो टनाचे हे होर्डिंग उभारण्याकरिता पायासुद्धा तेवढा मजबूत पाहिजे होता. परंतु, या महाकाय होर्डिंगकरिता अगदी कुचकामी बांधकाम केले गेल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या होर्डिंगकरिता अगदी किरकोळ बांधकाम करण्यात आले होते. या कुचकामी बांधकामामुळेच हे महाकाय होर्डिंग पडल्याचे समोर आले आहे. यामध्ये निष्पाप 14 नागरिकांचा बळी गेला, 74 जण जखमी झाले.
पेट्रोल पंपाच्या शेजारी होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिंडेविरोधात पंतनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या होर्डिंगचा मालक भावेश भिंडे सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. घाटकोपरमध्ये उभारलेल्या महाकाय होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडे विरोधात आता पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी करावे. त्याचबरोबर त्याला भगोडा घोषित करावे, अशी मागणीसुद्धा किरीट सोमय्या यांनी केली आहे.
घाटकोपर येथे सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे भलेमोठे होर्डिंग (Ghatkopar Hoarding Case) पेट्रोल पंपावर पडले. या दुर्घटनेमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला तर ७४ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पेट्रोल पंपाच्या शेजारी होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिंडेविरोधात पंतनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या होर्डिंगचा मालक भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. हा भावेश भिंडे नेमका आहे तरी कोण हे आपण जाणून घेणार आहोत.
भावेश भिंडेविरोधात गुन्हा दाखल
भावेश भिंडे हा इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मालक आहे. या कंपनीनेच घाटकोपर येथे हे होर्डिंग लावले होते. भावेश भिंडे हा मुलुंड येथे राहतो. होर्डिंग पडल्यानंतर पोलिसांनी भावेश भिंडेविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेण्यासाठी मुलुंड येथील त्याचे घर गाठले. परंतु, तो तेथून कुटुंबासहित फरार झाल्याचे समोर आले. त्यामुळे तो पत्ता येथील असला तरीही त्याचे राहण्याचे घर दुसरेच असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांना त्याचा फोन बंद लागत असून तो घरामध्ये नसल्याचे समोर आले. भावेश भिंडे फरार असून पोलिसांची टीम सध्या त्याचा शोध घेत आहे.
कोण आहे भावेश भिंडे?
भावेश भिंडे हा गुज्यू अ‍ॅड्स आणि इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालवतो. भावेश भिंडेचे वडील रिक्षाचालक होते. भावेशच्या घरची परिस्थिती खूपच हालाखीची होती. त्याने अ‍ॅड एजन्सीमध्ये ऑफिस बॉयचे काम केले होते. पण वडील निधनानंतर त्याने स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १९९३ मध्ये त्याने होर्डिंगचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू त्याने आपला व्यवसाय वाढवला. त्याला या व्यवसायामध्ये यश देखील आले. त्यामुळे हळूहळू तो एक एक स्टेशन पुढे गेला. त्याने ठाणे, मुलुंड, भांडूप, कुर्ला, कांजूरमार्ग, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला, माटुंगा आणि परेलपर्यंत आपला व्यवसाय वाढवला.
२००९ मध्ये लढवली निवडणूक
विशेष म्हणजे भावेश भिंडे हा नववी फेल आहे. त्याने आपला व्यवसाय कशाच्या जीवावर वाढवला असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. त्याचसोबत त्याने या व्यवसायात घोटाळा केल्याचा देखील आरोप केला जात आहे. महत्वाचे म्हणजे भावेशने या व्यवसायाद्वारे प्रसिद्ध मिळवली. त्यानंतर त्याने २००९ मध्ये मुलुंडमधून आमदारकीसाठी विधानसभा निवडणूक लढवली होती. ही निवडणूक त्याने अपक्ष म्हणून लढवली होती.
भावेश भिंडेविरोधात २१ गुन्हे
धक्कादायक बाब म्हणजे, त्याने निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात सुमारे २१ गुन्हे असल्याचं नमूद केले होते. त्याच्याविरोधात दाखल करण्यात आलेले २१ गुन्हे हे विनापरवानगी होर्डिंग्स लावल्याबद्दल आहेत. महापालिका कायदा अंतर्गत ३२८ कलमांतर्गत त्याच्यावर २१ गुन्हे हे २००९ पर्यंत दाखल होते. मग हा प्रश्न निर्माण होतो की एवढे गुन्हे दाखल असलेल्या साईन बोर्डच्या मालकाला घाटकोपरमध्ये भलेमोठे होर्डिंग लावण्यास रेल्वे पोलिसांनी परवानगी दिलीच कशी? आता या प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे.

 

Web Title: Bhavesh bhinde arrested in ghatkopar hoarding incident major action by mumbai crime branch nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2024 | 08:54 PM

Topics:  

  • Mumbai Municipal Corporation

संबंधित बातम्या

‘महापालिका निवडणुकांसाठी तयार राहा’; अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना
1

‘महापालिका निवडणुकांसाठी तयार राहा’; अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना

Mumbai BMC : मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांचे खांदेपालट; 7 उपयुक्तांसह 12 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या
2

Mumbai BMC : मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांचे खांदेपालट; 7 उपयुक्तांसह 12 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.