Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश, काय आहे नेमकं कारण

उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहे. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर लवकरच शिंदे गटात सामील होणार असल्याने हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. रवींद्र वायकर हे लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून, सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना तयारीत राहण्याचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 08, 2024 | 07:58 PM
Big shock to Uddhav Thackeray again; Ravindra Waikar will join Shinde's Shiv Sena

Big shock to Uddhav Thackeray again; Ravindra Waikar will join Shinde's Shiv Sena

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी कौटुंबिक संबंध असलेले नेते आणि आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar Shiv Sena) हे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडणार आहे. रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार आहेत. रवींद्र वायकर हे लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून, सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना तयारीत राहण्याचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

रवींद्र वायकर यांना ईडीचा त्रास, संजय राऊतांचे ट्विट

रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील कथित घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांची ईडीची चौकशीही सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच ट्विट करुन, रवींद्र वायकर यांना ईडी धमकावत असल्याचं म्हटलं होतं. तसंच रवींद्र वायकर यांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं.

गुप्त भेटीनंतर निर्णय?
जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीच्या रडारवर असलेले ठाकरे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी रवींद्र वायकर हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा होती. या आमदाराने एकनाथ शिंदे यांची गुप्तपणे भेट घेतल्याचीही चर्चा होती. मात्र, हा आमदार नेमका कोण, हे समजू शकले नव्हते. मात्र, आता आमदार रवींद्र वायकर असल्याची माहिती समोर येत आहे.

ईडीची रवींद्र वायकर यांच्यावर कारवाई

यापूर्वी ईडीने आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात रवींद्र वायकर यांची चौकशी केली होती. गेल्या महिन्यात रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाडही टाकली होती. त्यानंतर आता रवींद्र वायकर आता शिंदे गटात प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रवींद्र वायकर यांच्यासोबत स्थानिक शिवसैनिकही शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. वायकर यांनी सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना तयारीत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गुप्त बैठकीत काय चर्चा

एकनाथ शिंदे आणि रवींद्र वायकरांच्या गुप्त बैठकीत काय चर्चा झाली?
रवींद्र वायकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही दिवसांपूर्वी गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीत रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही मुळचे शिवसैनिक आहोत, धनुष्यबाणाचे पाईक आहोत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हाला तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायचे आहे, असे वायकरांनी एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचे समजते.

कोण आहेत रवींद्र वायकर? 
जोगेश्वरी भागातून 1992 मध्ये रवींद्र वायकर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर निवडून गेले. 2006-2010 या काळात वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून वायकर आमदार म्हणून निवडून आले. महाविकास आघाडी सरकारमध्ये रवींद्र वायकर यांच्याकडे गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे राज्यमंत्रीपदाची धुरा होती. त्यानंतर 2019च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये वायकर गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री होते.

Web Title: Big shock to uddhav thackeray again ravindra waikar will join shindes shiv sena nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2024 | 07:57 PM

Topics:  

  • Chief Minister Eknath Shinde
  • uddhav thackeray news

संबंधित बातम्या

ठाकरे गटासह काँग्रेस अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
1

ठाकरे गटासह काँग्रेस अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Kolhapur Politics फडणवीसांचा ‘तो’ कोल्हापूर दौरा यशस्वी; ठाकरेंचे दोन बडे शिलेदार भाजपच्या गळाला
2

Kolhapur Politics फडणवीसांचा ‘तो’ कोल्हापूर दौरा यशस्वी; ठाकरेंचे दोन बडे शिलेदार भाजपच्या गळाला

Waqf Amendment Bill: वक्फ सुधारणा विधेयकावरून अरविंद सावंतांनी मांडली पक्षाची भूमिका; म्हणाले, “… त्याचे समर्थन करणार नाही”
3

Waqf Amendment Bill: वक्फ सुधारणा विधेयकावरून अरविंद सावंतांनी मांडली पक्षाची भूमिका; म्हणाले, “… त्याचे समर्थन करणार नाही”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.