अमरावती : भाजपा नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांना नायब तहसीलदार यांना मारहाण व शिवीगाळ प्रकरणी चांगलच भोवलं आहे. या प्रकरणी अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना ३ महिने कारावास व २०हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे.
३० सप्टेंबर २०१६ रोजी अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचे शेकडो लाभार्थी वंचित राहील्याने वरुड तहसीलचे तत्कालीन नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांना अनिल बोंडे यांनी याबाबत विचारणा केली. अनिल बोंडे व नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांच्यात वाद झाला. शाब्दीक चमक उडाल्याने बोंडे यांनी काळे यांना मारहाण केली अशी तक्रार काळे यांनी केली. वरुड पोलिसांनी अनिल बोंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आज तब्बल पाच वर्षानंतर अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल देत अनिल बोंडे यांना तीन महिने सश्रम कारावास व २०हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
[read_also content=”‘ही आहे प्रधानमंत्री जन धन लूट योजना’, इंधन दरवाढीवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला निशाणा https://www.navarashtra.com/india/rahul-gandhi-criticized-prime-minister-narendra-modi-for-fuel-price-hike-nrsr-265060.html”]