Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे आंदोलन, भाजप शहराध्यक्षांच्या नेतृत्वात जोरदार निषेध

  • By युवराज भगत
Updated On: Jan 04, 2024 | 09:45 PM
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे आंदोलन, भाजप शहराध्यक्षांच्या नेतृत्वात जोरदार निषेध
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : देशभरात अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमी येथे भव्य मंदिर लोकार्पण आणि श्रींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. त्यासाठी देशभरात दिवाळी-उत्सव साजरा केला जात आहे. असे असताना विघ्नसंतुष्ट लोकांकडून तमाम हिंदूंचे आदर्श व श्रद्धस्थान प्रभू श्रीराम यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करुन शुभकार्यात ‘मिठाचा खडा’ टाकण्याचे काम राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड करीत आहेत, अशी घणाघाती टीका भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केली.

शहर भाजपाच्या वतीने आक्रमक भूमिका

‘‘शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून शाकाहार थोपवला जात आहे. १४ वर्षे जंगलात राहणारा राम शिकार करायचा. रामाने १४ वर्षे वनवास भोगला, मग तो शाकाहारी कसा असू शकतो?’’ अशी वादग्रस्त मुक्ताफळं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उधळली. त्याविरोधात शहर भाजपाच्या वतीने आक्रमक भूमिका घेताना जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पिंपरी येथे आंदोलन केले. यावेळी आव्हाड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनी केले आंदोलन

विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा पक्ष प्रवक्ते राजू दुर्गे, उपाध्यक्ष सिद्धेश्वर बारणे, आशा काळे, रवी देशपांडे, विनोद मालू, सरचिटणीस संजय मंगोडेकर, शैला मोळक, नामदेव ढाके, महिला मोर्च्याच्या सरचिटणीस वैशाली खाडये, युवा मोर्च्याचे अध्यक्ष तुषार हिंगे, माजी नगरासेविका योगिता नागरगोजे, प्रमोद ताम्हणकर, बाळासाहेब भुंडे, कार्यकारिणी सदस्य गणेश वाळुंजकर, मंडल अध्यक्ष निलेश अष्टेकर, संतोष तापकीर, रवी नांदुरकर, राजेंद्र बाबर, प्रसाद कस्पटे, सोमनाथ भोंडवे, क्रीडा प्रकोष्ठचे जयदीप खापरे, अभियंता सेलचे दीपक भंडारी, पंचायतराजचे अभिजित बोरसे, उत्तर भारतीय आघाडी प्रमुख आकाश भारती, भटके विमुक्तचे गणेश ढाकणे, कायदा सेलचे ऍड. गोरखनाथ झोळ, ऍड. दत्ता झुळूक, कामगार आघाडीचे अध्यक्ष नामदेव पवार, सामाजिक कार्यकर्ते समीर जवळकर, युवराज ढोरे, रणजित कलाटे, सीमा चव्हाण, मंगेश नढे,  मुकेश चुडासामा, दीपक नागरगोजे, शिवम डांगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आमच्या आराध्यांविषयी बेताल वक्तव्ये करू नये

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे सातत्याने सनातन धर्मावर टीका करतात. सनातन धर्मावर टीका करून कुणाची खुष्मस्कारी करतात, हे वेगळे सांगायची गरज नाही. मुद्दाम सनातन धर्माविषयी बेताल वक्तव्ये करणे, त्यातून वाद निर्माण करणे, समाज-समाजामध्ये तणाव वाढविताना आपली पोळी भाजून घेणे यासाठीच जितेंद्र आव्हाड प्रसिद्ध आहेत. त्यांनी यापूर्वी देखील अनेकदा अशी निराधार वक्तव्ये त्यांना भोवली आहेत. काल तोडलेले अकलेचे तारे हेच त्यांच्या निकृष्ट विचारधारेचे प्रतिक आहे. त्यामुळे आपली विचारधारा आपल्या जवळच ठेवावी, आमच्या आराध्यांविषयी बेताल वक्तव्ये करू नये, अन्यथा त्यांना आमच्या प्रखर विरोधाचा सामना करावा लागेल, असा थेट इशारा भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिला.

आमच्या भावना दुखावण्याचे काम
भव्य राममंदिराचे निर्माण होत असताना, अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्ये करून आमच्या भावना दुखाविण्याचे दुष्कर्म जितेंद्र आव्हाड सातत्याने करत आहेत. प्रत्येक वेळेस अशा प्रकाराची वादग्रस्त वक्तव्ये करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. त्यांच्या या वक्तव्यांवर महाविकास आघाडीचे नेते देखील मौन बाळगून आहेत. भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम यांच्याबाबत बेताल बोलणे, अशा विकृत विचारसरणीला वेळीच लगाम घातला पाहिजे, अशी घणाघाती टीका  भाजपा, शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केली.

Web Title: Bjp protest in pimpri chinchwad against ncp mla jitendra awhads controversial statement strong protest led by bjp city president nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2024 | 09:45 PM

Topics:  

  • BJP city president Shankar Jagtap

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.