मुंबई: ‘भाजपचा आज वर्धापनदिन आहे. पण तो तिथीप्रमाणे आहेकी तारखेप्रमाणे आहे की त्यांच्य सोयीप्रमाणे मग मी शुभेच्छा देतो. रामनवमी हा तुमच्या पक्षाचा जन्मदविस असेल तर प्रभू रामचंद्र वागले तसे वागण्याचा प्रयत्न करा,’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. रामनवमीनिमित्त आज (6 एप्रिल) ठाकरे गटाच्या कम्युनिकेशन विगंची स्थापनेच्या निमित्ताने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वक्फ सुधाऱणा विधेयकाच्यामुद्द्यावरून काँग्रेस कोर्टात जाणार आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही कोर्टात जाणार नाही. काँग्रेस जात असेल तर त्याना जाऊद्या. आम्ही आमची भूमिका मांडली आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले की, निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले, पण तुम्ही फसवणूक लोकांची मते घेतली. हे उघड झाले आहे. त्यामुळे या लोकांची रामाचे नाव घेण्याची यांची पात्रता नाही. माणिकराव कोकाटेंवरच फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. कोर्टात त्यांचा आश्चर्यकारक निकाल लागला. त्यामुळे त्यांच मंत्रीपद आणि सदस्यत्व वाचलं. गुन्हा सिद्ध होऊनही शिक्षा न झालेली ही पहिली व्यक्ती असेल.
काँग्रेस पक्षाचा मोठा निर्णय; ‘या’ बड्या नेत्यावर दिली पुण्याची जबाबदारी
काल आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांसाठी मराठी भाषेचे वर्ग सुरू कऱण्यात आले आहेत. ज्यांना मुंबईत राहुन उद्योग-व्यवसाय करायचे आहेत त्यांनी या वर्गांचा उपयोग करून घ्यावा,असे आवाहन ठाकरे गटाकडून कऱण्यात आली आहे. वक्फ बोर्डाच्या निर्णयाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजप फक्त लॅंड लँड आणि व्यापार असं करणारा पक्ष आहे. पण त्यांचे लक्ष फक्त त्यांच्या मित्रांकडेच आहे.
वक्फबोर्डाकडे जितक्या जमीनी आहेत, त्या काढून त्यांच्या व्यापारी मित्रांना द्यायच्या, ख्रिश्चन कमिटीच्या जमिनी काढा आणि आपल्या मित्रांना देऊन टाका, गुरूद्वारा, जैन समाजाकडे किती जमिनी आहेत त्याही काढून आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत. सर्व जमिनी याना मित्रांना द्यायच्या आहेत.त्यांनी लोकांशी काही घेणदेणं नाही. वक्फबिलाचे हिंदूशी काहीच घेणंदेण नाही. ज्यापद्धतीने ते भाषण केली आहेत ती फक्त मुस्लिमांच्या बाजूने आहेत. मग आम्ही हिंदुत्त्व सोडलं हे म्हणण्याचा अधिकार त्यांना कुणी दिली. ऑर्गनायझरने त्यांचा छुपा अजेंडा पूर्णपणे उघडला आहे. ऑर्गनायझरच्या लेखात सर्वकाही नमुद आहे.आता त्यांनी मुस्लिम समाज्याच्या जमिनी बळकावल्या आहेत. त्यानंतर त्याचं लक्ष ख्रिश्चन कमिटीकडे आहे, ख्रिश्चन समाजाच्या जमिनी बळवायच्या आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला.
Jaspreet Bumrah : जसप्रीत बुमराहचे कमबॅक! मुंबईच्या चाहत्यांना खुशखबर, तर विरोधी संघांसाठी
“गेली २७ वर्षे वनवासात होतो का?” – उद्धव ठाकरे यांचा सवाल
“माझ्या शुभेच्छा कोणत्याही विशिष्ट मित्रपक्षापुरत्या मर्यादित नाहीत, त्या सर्वांनाच असतात. रामनवमी जर तुमच्या पक्षाचा वर्धापनदिन असेल, तर रामप्रभूंप्रमाणे आचारधर्म पाळण्याचा प्रयत्न करा – एवढ्याच माझ्या शुभेच्छा आहेत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे ते म्हणाले, “गेली २७ वर्षे मी जणू वनवासात होतो असे समजावे का?”
“शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा – मोबदला नाहीच!”
“आजचा युग प्रगत आहे. मोबाईल आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, जर हेच तंत्रज्ञान सामान्य माणसाच्या फसवणुकीसाठी वापरले जात असेल, तर ते निश्चितच अयोग्य आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. “अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींमधून केबल लाईन टाकल्या जातात, पण त्यांना त्याचा कोणताही मोबदला दिला जात नाही. कर भरण्याची जबाबदारी आम्ही पार पाडतो, पण ही जी लुट सुरू आहे, तिला आळा घालण्यासाठी शिवसेना आता पुढे येत आहे,” असे ते म्हणाले.