Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाच आणि खंडणीचे प्रकरण : अटीशर्तींसह समीर वानखेडेंना अटकेपासून अंतरिम संरक्षण कायम, सुट्टीकालीन उच्च न्यायालयाचे आदेश

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना व्हॉट्सअ‍ॅपवरील संभाषण प्रसार माध्यमांमध्ये फिरवण्याची काय गरज होती? याचिका न्यायप्रविष्ट असताना तुम्ही माध्यमांकडे का गेलात?, अशा शब्दात न्या. अभय अहुज आणि न्या. मिलिंद साठये यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. आर्यन खान अमलीपदार्थ प्रकरणी अंतरिम दिलासा मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याची सूचना दिल्ली उच्च न्यायालयाने वानखेडेंना दिली.

  • By Vivek Bhor
Updated On: May 22, 2023 | 08:23 PM
लाच आणि खंडणीचे प्रकरण : अटीशर्तींसह समीर वानखेडेंना अटकेपासून अंतरिम संरक्षण कायम, सुट्टीकालीन उच्च न्यायालयाचे आदेश
Follow Us
Close
Follow Us:

मयुर फडके, मुंबई : आर्यन खानची (Aryan Khan) सुटका करण्यासाठी २५ कोटी रुपयांची लाच आणि खंडणी (25 Crores In Bribes And Extortions) मागितल्याच्या आरोपाप्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडेंना (Former Mumbai Director of Central Narcotics Control Department Sameer Wankhede) अटीशर्तींसह पुढील सुनावणीपर्यंत कठोर कारवाईपासून सुट्टीकालीन उच्च न्यायालयाने (Vacation High Court) सोमवारी अंतरिम संरक्षण (Interim Protection) दिले आहे.

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना व्हॉट्सअ‍ॅपवरील संभाषण प्रसार माध्यमांमध्ये फिरवण्याची काय गरज होती? याचिका न्यायप्रविष्ट असताना तुम्ही माध्यमांकडे का गेलात?, अशा शब्दात न्या. अभय अहुज आणि न्या. मिलिंद साठये यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. आर्यन खान अमलीपदार्थ प्रकरणी अंतरिम दिलासा मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याची सूचना दिल्ली उच्च न्यायालयाने वानखेडेंना दिली. त्यानंतर गुन्हा रद्द करण्यासाठी आणि याचिका निकाली निघेपर्यंत अटकेसारख्या कठोर कारवाईपासून संरक्षण देण्याची मागणी करून वानखेडेंनी याचिका केली आहे.

[read_also content=”मणिपूरमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार, इंफाळमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळ झाल्यानंतर संचारबंदी लागू https://www.navarashtra.com/crime/update-manipur-unrest-violence-army-called-in-after-fresh-flare-up-in-imphal-curfew-is-back-nrvb-402625.html”]

न्यायालयाची नाराजी

वानखेडेने अभिनेता शाहरुख खानसोबतच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील संभाषण प्रसार माध्यामांना दिले असल्याची माहिती सुनावणीदरम्यान सीबीआयचे वकील कुलदीप पाटील यांनी न्यायालयाला दिली. वानखेडेंच्या वर्तनावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. त्यावर वानखेडेंकडून कोणतेही संभाषण प्रसारमाध्यमांना देण्यात आलेले नाही. माध्यमांनी सर्व माहिती याचिकेच्या प्रतवरून उचलली असल्याचा दावा वानखेडेंच्या वतीने ॲड. आबाद पोंडा यांनी केला. तसेच शाहरुखने येथे पिता म्हणून वानखेंडेंशी संवाद साधला आहे.

आपल्या मुलाला याप्रकरणातून धडा मिळाला, मला व्यवस्थेवर विश्वास आहे, असे शाहरुखने संभाषणात म्हटल्याचेही पोंडानी सांगितले. या संभाषणातून वानखेडेंनी लाच घेतल्याचा, भ्रष्टाचार केल्याचा कुठेही उल्लेख नाही. दुसरीकडे, वानखेडेंनी सादर केलेली माहिती आणि पुरावे पाहता सीबीआयची चौकशी (CBI Investigation) निराधार असल्याचे समोर येईल, असा दावाही पोंडा यांनी केला.

अंतरिम संरक्षणाला विरोध

वानखेडेंना याप्रकरणी डोळे झाकून कोणत्याही प्रकारचे संरक्षण देऊ नये, सध्या प्रकरण प्राथमिक टप्प्यावर आहे. वानखेडेंना संरक्षण दिल्यास साक्षीदार आणि पुराव्याशी छेडछाड करू शकतात, असा दावा सीबीआयच्या वतीने अँड. कुलदीप पाटील यांनी केला.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : 22 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-22-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]

दोन आठवड्यात भूमिका मांडा

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १७ अ नुसार, या प्रकरणी चौकशी कशी योग्य आहे त्याबाबत सीबीआयला ३ जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे तर त्यावर वानखेडेंना प्रत्यूत्तर देण्यासाठी ७ जूनपर्यंतचा कालावधी देऊन खंडपीठाने सुनावणी ८ जून रोजी निश्चित केली.

अटीशर्तींचे पालन करून अंतरम संरक्षण

वानखेडेंनी याचिका किंवा तपासातील विषयावर व्हॉट्सअ‍ॅप किंवा अन्य कोणत्याही पद्धतीची माहिती प्रसारमाध्यमांकडे देऊ अथवा संपर्क साधू नये, कोणत्याही साक्षी, पुराव्यांशी छेडछाड करू नये, बोलावण्यात येईल तेव्हा चौकशीला हजर रहावे, इत्यादी अटीशर्तींचे पालन करण्याचे आदेश देऊन खंडपीठाने वानखेडेंना अंतरिम संरक्षण दिले.

Web Title: Bribery and extortion case sameer wankhedes interim protection from arrest continued with conditions vacation high court order nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2023 | 08:23 PM

Topics:  

  • sameer wankhede

संबंधित बातम्या

“सोशल मीडिया फॅन क्लब हे हिटलरच्या गोबेल्ससारखे…”, आर्यन खान प्रकरणात अडकलेल्या समीर वानखेडे यांचे मोठे विधान
1

“सोशल मीडिया फॅन क्लब हे हिटलरच्या गोबेल्ससारखे…”, आर्यन खान प्रकरणात अडकलेल्या समीर वानखेडे यांचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.