पुणे : पुणे कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक आणि बिल्डर विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून संभाजीनगर येथून त्यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार होते. पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला होता.
पुणे पोलिसांची तपासासाठी पथकं झाली होती रवाना
या हायप्रोफाईल एरियामध्ये झालेल्या अपघाताने शहरात खळबळ उडाली होती. कारण यामध्ये दोन तरुण-तरुणीचा जागेवर मृत्यू झाला होता. त्यानंतर या मुलाला एक दिवसाच्या आत जामीन मिळाल्याने हा प्रकार क्लेशदायक असल्याने कॉंग्रेसकडून आंदोलन करण्यात आले होते. यानंतर पुणे पोलिसांनी त्यांच्या तपासासाठी पथकं तयार केली होती. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी संभाजीनगरमधून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेण्यात आले. विशाल अग्रवाल यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.
After much public uproar, Vishal Agarwal, Pune builder & father of the minor accused, has been arrested under multiple sections from Aurangabad in the Porche car crash case. Pub owner who allowed minor to drink also booked Police meanwhile move application to try the juvanile… pic.twitter.com/664EzHE4Gm — Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) May 21, 2024
नोंदणी न करताच कार रस्त्यावर आणि टॅक्ससुद्धा न भरलेला
पुण्याच्या कल्याणीनगर भागात घडलेल्या अपघातात उच्चशिक्षित तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. त्या उच्चभ्रू अपघाताचे आता मुंबई कनेक्शन समोर आले असून, ती आलिशान पोर्शो कार मुंबई-व्हाया-पुणे अशी शहरात दाखल झाली आहे. धक्कादायक म्हणजे, या कारची आरटीओ कार्यालयात नोंदणीच झालेली नसून, नोंदणी न होताच ती गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांवर चालवली जात होती. तिचा ४० लाखांचा टॅक्स न भरल्याने तिची नोंदणी झालेली नाही, अशी माहिती आरटीओ कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अपघातात मृत झालेल्या त्या युवक व युतीच्या कुटुंबीयांना विम्याच्या रकमेचा लाभ मिळणार का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. एकूणच या अपघातामुळे सर्वच सरकारी यंत्रणांचा भोंगळ कारभार समोर येऊ लागला आहे.
ही अलिशान कार परराज्यातून महाराष्ट्रात दाखल
मात्र, कल्याणीनगरमधील अपघातातील त्या पोर्शो कारवर दोन्ही बाजूने नंबर प्लेट नसल्याने यासंदंर्भात माहिती घेतली असता धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ही अलिशान कार परराज्यातून महाराष्ट्रात दाखल झाली आहे. ती कार मुंबईतील एका शोरूममधून संबंधित बिल्डराने घेतली. त्यानंतर ती नावावर करण्यासाठी २० मार्च २०२४ म्हणजे, बरोबर दोन महिन्यांपुर्वी आरटीओ कार्यालयात अर्ज दाखल केला होता. आरटीओ कार्यालयाने त्याचे पाहणी (इन्स्पेक्शन) केली. त्यानुसार या कारच्या किंमतीनुसार साधारण ४० लाख रुपयांचा कर (टॅक्स) भरणा करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, तो कर भरण्यात आला नाही. त्यामुळे त्याची नोंदणी प्रक्रिया पुर्ण झाली नाही. तसेच, संबंधित गाडीबाबत नंतर आरटीओ कार्यालयाकडे आलेही नाही.