Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा एकदा संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल; तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल; वाचा सविस्तर

Buldhana : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांच्यासह पाच जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Mar 01, 2024 | 06:29 PM
mla sanjay gaikwad

mla sanjay gaikwad

Follow Us
Close
Follow Us:

Buldhana News : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. एका तरुणाला बेदम मारहाणीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्याने शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. नुकतेच आपण वाघाची शिकार करून त्याची वाघनखे गळ्यात लॉकेट म्हणून घातल्याचा दावा करणारा एका व्हिडिओमुळे अडचणीत आलेल्या गायकवाड यांच्या विरोधात जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका महिलेची शेतजमीन हडपून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून संजय गायकवाड यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोराखेडी पोलिसांनी (Buldhana Police) मोताळा न्यायालयाच्या आदेशावरून बुधवारी, 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्री कारवाई करत हा गुन्हा दाखल केला आहे.

जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल
नागपूर येथील रीता यमुनाप्रसाद उपाध्याय (42 , रा. नागपूर) यांची मोताळा तालुक्यातील राजूर शिवारातील गट नंबर 62 मध्ये दीड एकर शेती आहे. 2021 च्या कोरोना काळात आमदार संजय गायकवाड आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी संगनमत करून ही शेतजमीन बळजबरीने ताब्यात घेतली. या जागेवर आमदार गायकवाड यांना अलिशान फार्म हाऊस बांधण्यासाठी सुरुवातदेखील केली. या शेतजमिनीवर अतिक्रमण करून शेतीची कुंपणेही त्यांनी काढून टाकले. सोबतच आपण देत असलेल्या दरात शेतजमीन आपल्या नावावर करून द्यावी, असा तगादाही गायकवाड यांनी उपाध्याय यांच्याकडे लावला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

आमदार गायकवाडांसह चौघांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी उपाध्याय यांनी पोलिसांत तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी याविषयी फार दखल न घेता कुठलीही कारवाई केली नाही. त्यानंतर उपाध्याय यांनी मोताळा येथील न्यायालयात धाव घेतली असता, आमदार संजय गायकवाड यांच्यासह त्यांचा चिरंजीव मृत्युंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात भादवी 156(3), 143, 150, 379, 385, 447 आणि 34 नुसार बोराखेडी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सारंग नवलकार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राजवंत आठवले हे करीत आहेत.

स्वत: वाघाची शिकार केल्याचा दावा
आमदार संजय गायकवाड यांनी 19 फेब्रुवारी रोजी आयोजित शिवजयंती कार्यक्रमात आकर्षक पेहराव केला होता. हातात तलवार, डोक्यावर फेटा, गळ्यात मोत्यांच्या माळा असा तो पेहराव होता. त्यावर बुलढाणा येथील एका स्थानिक प्रसारमाध्यमाच्या पत्रकाराने त्यांच्या वेशभूषेसंदर्भात मुलाखत घेताना प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी गायकावाड यांच्या गळ्यातील लॉकेटबाबत विचारले असता, ते म्हणाले, हा दात वाघाचा असून, आपण स्वत: 1987 मध्ये वाघाची शिकार केली होती. तोच दात आपण लॉकेटमध्ये घातले असल्याचे वक्तव्य त्यावेळी त्यांनी केले होते. त्यांचा या व्यक्तव्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती.

दातसदृश वस्तू वन विभागाने घेतली ताब्यात

त्यानंतर या व्यक्तव्याची दखल घेत वन विभागाने गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली होती. सोबतच संबंधित दातसदृश वस्तू वन विभागाने आपल्या ताब्यात घेतली होती. आता ही कथित स्तरावरील वाघदातसदृश वस्तू डेहराडून येथील वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूटमध्ये डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. तेथून यासंदर्भातील अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे बुलढाणा वन विभागातील प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे म्हणाले होते.

 

Web Title: Buldhana news big news another case has been filed against sanjay gaikwad who was in trouble for tiger hunting nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2024 | 06:29 PM

Topics:  

  • Shiv Sena Shinde group

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.