Chikhli Drought news
Washim: कारंजा-वाशिम मार्गावर भीषण दुर्घटना! दोन मुख्याध्यापकांसह तिघांचा मृत्यू; परिसरात शोककळा
दुष्काळामुळे शेतकरीबांधवांसह ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून मदतीसाठी पुढे येणे महत्त्वाचे आहे. याच भावनेतून ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी आपल्या एक दिवसाच्या वेतनाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकारघेतला. यावेळी विदर्भ पटवारी संघाचे बुलढाणा उपविभाग अध्यक्ष योगेश भुसारी, चिखली तालुका सचिव रुपेश एकडे, बुलढाणा जिल्हा कोषाध्यक्ष संजय डुकरे पाटील, मंडळ अधिकारी संघटनेचे संजय सरागे, बुलढाणा जिल्हा मंडळ अधिकारी संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मंगल सवडतकर, तलाठी पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल जाधव, तसेच कल्पना वानखेडे, इंदु शेजोळ, नितीन काळे, सुनील डव्हळे व जय सिरसाट यांच्यासह चिखली तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी उपस्थित होते.
दुष्काळग्रस्तांच्या मदती साठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी ही संकटाच्या काळात गरजूंच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रेरणादायी संदेश देणारी आहे.या उपक्रमातून प्रशासनातील संवेदनशीलता आणि समाजाप्रती असलेली कर्तव्यनिष्ठा अधोरेखित झाली.
ग्राम महसूल अधिकारी हे ग्रामीण भागातील नागरिक आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळातील परिस्थितीची त्यांना जवळून जाणीव असते. त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक दिवसाचे वेतन कपात करण्याचाबत घेतलेला हा पुढाकार सामाजिक बांधिलकी, प्रशासकीय संवेदनशीलता आणि माणुसकीचे दर्शन घडवणारा आहे.
Buldhana: उत्पादन घटले; सोयाबीनचे दर वधारले, अपुऱ्या पावसाचा फटका; शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात






