Buldhana: दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ६ महिन्यांचे वेतन देणार! केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांची मोठी घोषणा

Prataprao Jadhav to donate 6 Months Salary to Farmers: केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव मेहकरमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि आरोग्य सेविकांचा सन्मान केला. तसेच, यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सहा महिन्यांचे वेतन देण्याची घोषणा केली.
Prataprao Jadhav to donate 6 Months Salary
Prataprao Jadhav to donate 6 Months SalaryPrataprao Jadhav to donate 6 Months Salary
Published on: 
Updated on: 
  • दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मदतीचा हात

  • प्रताप जाधव देणार सहा महिन्यांचे वेतन

  • केंद्रीय मंत्र्यांचा मोठा निर्णय

मेहकर: महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती अतिशय भीषण असून, मी माझे मंत्रीपदाचे ६ महिन्याचे वेतन मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त निधीसाठी देणार आहे, अशी घोषणा केंद्रीय आयुष, आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त बुधवारी प्रा. सचिन जाधव मित्र मंडळाच्या वतीने आयोजित अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेविका यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

जन्मदिवसानिमित्त ६ दिवस श्री राम कथा यज्ञ व दररोज कीर्तनकारांची कीर्तने, असे आयोजन डी. पी. रोडवरील भव्य शामियाण्यात करण्यात आले होते. बुधवारी स्वामी श्री हरिचेतन्यजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. ८ हजार भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात आले. त्यानंतर करोनाकाळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या मेहकर, लोणार तालुक्यातील १ हजार ६०० अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेविका आदींचा साडी, योगा मॅट आणि स्मृतिचिन्ह देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

Prataprao Jadhav to donate 6 Months Salary
Khamgaon: कापूस उत्पादक शेतकरी संभ्रमात! CCI केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा कायम; खासगी व्यापाऱ्यांकडून ५० हजार क्विंटल खरेदी

खा. ज्योती वाघमारे सोहळ्याच्या विशेष अतिथी होत्या. माजी आ. संजय रायमूलकर, माजी आ. तोताराम कार्यदे, शिवसेनेचे जिल्हा संघटक दिलीप देशमुख, बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, उपजिल्हाप्रमुख किसन बळी, तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, भगवानराव सुलताने, शहरप्रमुख जयचंद बठीया, प्रा. डॉ. सचिन जाधव, राहुल देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अॅड. उल्हासराव जाधव, विजयराव जाधव, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दत्तात्रेय टेकाळे, उपाध्यक्ष मदनराव चनखोरे, समाधान साबळे, नीरज रायमूलकर, राजीव काटे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल जवंजाळ, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख भूषण घोडे, तालुकाप्रमुख संदीप आल्हाट, नंदू बंगाळे, शिवकुमार तेजनकर, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख माया म्हस्के, आरती दीक्षित, वैशाली सावजी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

महायुतीने शेतकऱ्यांना दिली कर्जमाफी

आपल्या भाषणात प्रताप जाधव पुढे म्हणाले की, महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे यांनी मोठे काम करीत आहेत. शुक्रवारी मेहकर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असून, त्यांच्या उपस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अपंगांना तीनचाकी सायकल, शेतकऱ्याच्या ३ हजार मुलामुलीना सायकल, शेतकऱ्यांच्या विधवा, परित्यक्ता यांच्यासाठी जिल्ह्यात ३ हजार शिलाई मशीन शिवसेनेतर्फे वितरित करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ याच कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

Prataprao Jadhav to donate 6 Months Salary
Buldhana: आधी अवैध रेती उपसा थांबवा, बोटी बंद करा; खडकपूर्णा प्रकल्पात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा, प्रशासनाला थेट इशारा