Case filed against BJP MLA Sunil Kamble; A case of beating a policeman
पुणे : ससून रुग्णालयातील कार्यक्रमात शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाण प्रकरणात पुणे पोलिसांनी भाजप आमदार सुनिल कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार शिवाजी सरक यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पुणे पोलिसांनी भादंवि कलम ३५३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
बीजेपी विधायक सुनील कांबले ने पुलिस के जवान को मारा थप्पड़। सभा देखिए उप मुख्यमंत्री अजीत पवार, एनसीपी अजित गुट के प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे भी मौजूद थे। पुलिसकर्मी को भी पलटवार करना था।https://t.co/k8c0rLmx3e
— Socialist Spirit (@SocialistSpirit) January 5, 2024
कोनशिलेवर नाव नसल्याने त्रागा
शुक्रवारी ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांच्या वार्ड उद्घाटन सोहळा पार पडला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. परंतु, भाजप आमदार सुनील कांबळे यांचे कोनशिलेवर नाव नसल्याने त्यांचा त्रागा झाला. त्यावरून चांगलाच गोंधळदेखील झाला. आमदार सुनील कांबळे यांनी एनसीपी पदाधिकाऱ्याच्या कानशिलात मारली. त्यानंतर मोठीच गडबड झाली.
असा घडला प्रकार
याचवेळी तक्रारदार शिवाजी सरक हे संबंधित कार्यक्रमात बंदोबस्तावर तैनात होते. नियमाने ते स्टेजच्या पायऱ्यांवर तो व्हीआयपींसाठी उभे होते. त्यांना उतरण्यासाठी सरक हे सहकार्य करीत होते. त्यांच्या बंदोबस्तासाठी थांबलेले होते. तेव्हा सुनील कांबळे हे पायऱ्यांवरून खाली येत असताना त्यांचा पाय अडखळला. त्यामुळे सरक यांनी त्यांना सावरले. परंतु, सुनिल कांबळे यांनी सरक यांच्या कानशिलात मारली. तेव्हा सरक यांनी पोलीस असल्याचे सांगत त्यांना आयकार्ड दाखविले असतानाही सुनिल कांबळे यांनी मग काय झाले, असे दरडावून सांगत ते करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्यानंतर पुणे पोलिसांनी रात्रीत आमदार सुनिल कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.