Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्र सरकारची गुजरातच्या पांढरा कांद्याला निर्यातीची परवानगी; हा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर अन्याय

केंद्र सरकारने गुजरातमधून दोन हजार टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 26, 2024 | 05:14 PM
केंद्र सरकारची गुजरातच्या पांढरा कांद्याला निर्यातीची परवानगी; हा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर अन्याय
Follow Us
Close
Follow Us:

पुणे – देशभरातील कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. यामुळे संपुर्ण देशातील कांदा उत्पादक शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. मात्र केंद्र सरकारने गुजरातमधून दोन हजार टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. गुजरात सरकारच्या फळे, फुले आणि भाजीपाला विभागाच्या आयुक्तांच्या परवानगीने ही निर्यात करता येणार आहे. केंद्रीय वाणिज्य खात्याच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या परराष्ट्र व्यापार विभागाच्या महासंचालकांनी या बाबतचा आदेश गुरुवारी काढला आहे. यामुळे मात्र महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग रोष व्यक्त करत आहे.

गुजरातमधून दोन हजार टन पांढरा कांदा निर्यात करता येणार आहे. राज्य सरकारच्या फळे, फुले आणि भाजीपाला विभागाच्या आयुक्तांच्या परवानगीनंतर मुद्रा, पिपावाव आणि न्हावा-शेवा (जेएनपीटी) बंदरातून ही निर्यात करता येणार आहे. काही मित्रदेशांना या आधीच कांदा निर्यात केला जात आहे. ही निर्यात एनसीईएल या संस्थेकडून केली जात आहे. मात्र, गुजरातमधून होणारी पांढऱ्या कांद्याची निर्यात एनसीईएलकडून न होता, राज्य सरकारच्या परवानगीने गुजरातच्या स्थानिक शेतकऱ्यांना करता येणार आहे. मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अद्यापही कांदा निर्यात बंदी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गुजरातबाबत केंद्र सरकारचा एक नियम आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी एक नियम असा दुजाभाव का असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

केंद्र सरकारच्या या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील नाराजी व्यक्त केली आहे.  महाराष्ट्रासारख्या कांदा उत्पादक राज्यावर अन्याय करणारा निर्णय असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कैलास लिंभोरे यांनी देखील या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. केंद्राचा निर्णय महाराष्ट्रावर अन्याय करणारा आहे. गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या पंचवीस टक्केही कांदा पिकत नाही. असे असताना तेथील निर्यातीस परवानगी देणे चुकीचे आहे. राज्यातही पन्नास टक्के कांदा निर्यातीला परवानगी देण्यात यावी. अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Central governments permission to export white onions from gujarat this is injustice to the farmers of maharashtra nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2024 | 05:14 PM

Topics:  

  • onion export

संबंधित बातम्या

US- India Trade : अमेरिकेत फळे-भाजी निर्यात वाढणार, व्यापार करार अंतिम टप्प्यात
1

US- India Trade : अमेरिकेत फळे-भाजी निर्यात वाढणार, व्यापार करार अंतिम टप्प्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.