Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोथरुडमधील रस्ते अन् पाणी प्रश्नावरुन चंद्रकांत पाटील आक्रमक; पुढील आठवड्यात…

कोथरूडमधील रस्ते, पाणीप्रश्नी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चांगलेच आक्रमक झाले असून, वस्तुस्थिती आणि आदर्श स्थितीवर आधारित अहवाल सादर करण्याचे निर्देश पाटील यांनी आजच्या बैठकीत दिले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 31, 2025 | 07:07 PM
कोथरुडमधील रस्ते अन् पाणी प्रश्नावरुन चंद्रकांत पाटील आक्रमक; पुढील आठवड्यात...

कोथरुडमधील रस्ते अन् पाणी प्रश्नावरुन चंद्रकांत पाटील आक्रमक; पुढील आठवड्यात...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : कोथरूडमधील रस्ते, पाणीप्रश्नी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चांगलेच आक्रमक झाले असून, वस्तुस्थिती आणि आदर्श स्थितीवर आधारित अहवाल सादर करण्याचे निर्देश पाटील यांनी आजच्या बैठकीत दिले. तसेच, पुढील आठवड्यात सदर अहवालाच्या अनुषंगाने आयुक्तांसोबत बैठक घेऊन मार्ग कढण्याबाबत आश्वस्त केले.

कोथरुडमधील रस्ते, पाणी, वाहतूक कोंडी आदी प्रमुख विषयासंदर्भात चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला महापालिकेचे मालमत्ता विभागाचे अतिरिक्त आयुक्त महेश पाटील, पाणीपुरवठा विभागाचे नंदकुमार जगताप, भवन विभागाचे युवराज देशमुख, महसूल विभागाचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे, विलास भालेराव यांच्या सह भाजपा कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्या सह इतर उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला कोथरुड मतदारसंघातील पाणीपुरवठ्यातील अडचणींची माहिती पाटील यांनी घेतली. यात प्रामुख्याने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वस्ती आणि सोसायटी भागात समान पाणीपुरवठा व्हावा; यासाठी महापालिकेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. कोथरुडमधील वस्ती भाग हा अनेक ठिकाणी चढावर वसलेला असल्याने, उन्हाळ्यात पाणीपुरवठा करताना मर्यादा येत असल्याची बाब अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणली. यामध्ये प्रामुख्याने सुतारदरा, किष्किंधा नगर केळेवाडी भागावर परिणाम होत असल्याचेही निदर्शनास आणून दिले, त्यावर उपाय म्हणून लोकसहभागातून वस्ती भागाच्या सुरुवातीला पाण्याच्या टाक्या उपलब्ध करुन देऊ, सदर टाक्यांमध्ये महापालिकेने पाणी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले.

याशिवाय कोथरुडमधील विकास आराखड्यातील रस्त्यांबाबतही बैठकीत चर्चा झाली. यामध्ये परांजपे शाळेसमोरील डीपी रस्त्यामधील एक रहिवासी न्यायालयात गेल्याने, सदर ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याची बाब पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर सदर रस्ता नागरिकांच्या सुविधेसाठी आवश्यक असल्याने महापालिकेने न्यायालयात प्रभावी बाजू मांडावी, अशी सूचना केली. याशिवाय चांदणी चौकातील मुख्य महामार्गालगत एकलव्य महाविद्यालय येथून जाणाऱ्या १५ मीटरच्या रस्त्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याबाबत खंत व्यक्त केली. तसेच, हा प्रश्न जलदगतीने सोडविण्यासाठी सदर भागातील अतिक्रमणे हटवावित. त्यासोबतच रस्त्याचे काम निश्चित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

याशिवाय बाणेर बालेवाडी भागातील नागरिकांची सातत्याने नाट्यगृहाची मागणी होत आहे. त्याशिवाय कोथरुडमध्येही शास्त्रीय नृत्यासह इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी संकुल उभारण्याची मागणी स्थानिक नागरीक तथा कलाप्रेमींकडून सातत्याने होत आहे. दोन्ही मागण्यांच्या अनुषंगाने जागा आणि नाट्यगृह तथा संकुल उभारण्यासाठी अपेक्षित खर्च आदींवर सविस्तर अध्ययन करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, या विषयांसह मतदारसंघातील इतर समस्यांसंदर्भात वस्तुस्थिती आणि आदर्श स्थितीवर आधारित अहवाल तयार करण्याचे निर्देश पाटील यांनी बैठकीत दिले. सदर अहवालाच्या अनुषंगाने आयुक्तांसोबत बैठक घेऊन मार्ग काढू, असे यावेळी आश्वस्त केले.

Web Title: Chandrakant patil held a meeting regarding the road and water issues in kothrud nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 07:03 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.