

मयुर फडके, मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) आणि समाजसुधारक महात्मा फुले (Mahatma Phule) यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive Statement) केल्याप्रकरणी भाजपाचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (BJP Higher Education Minister Chandrakant Patil) यांच्याविरोधातील समाजामाध्यमांवर टिपण्णी कऱणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ता संदीप कुदळेविरोधात (Congress worker Sandeep Kudale) पुणे पोलिसांनी (Pune Police) दाखल केलेला गुन्हा सोमवारी उच्च न्यायालयाने (High Court) रद्द करून त्याला दिलासा दिला. तसेच बेकायदेशीररित्या अटक केल्याबद्दल संबंधित पोलीस अधिकाऱ्याला दंडाची २५ हजारांचा दंड ठोकावून रक्कम त्यांच्या पगारातून वसूल करण्याचे आदेश दिले.
चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल कुदळे यांच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. एकाच गुन्ह्यासाठी दोन गुन्ह्यांची गरजच काय?, असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला आणि पोलीस अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशांना नाकारायला शिका. तसे करणे शक्य नसल्यास त्या आदेशांची लेखी मागणी करा, असे महत्त्वपूर्ण निरिक्षण न्यायालयाने आदेशात नमूद केले आणि संदीपविरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द केला.
चंद्रकांत पाटील यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर संदीप कुदळेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. याबद्दल पुणे पोलिसांनी संदीपविरोधात गुन्हा दाखल केला तो गुन्हा रद्द करण्यासाठी संदीपने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीनंतर न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने 18 जानेवारी रोजी आपला निकाल राखून ठेवला होता. पोलिसांना त्यांच्या पातळीवर काम करताना प्रचंड दडपण आणि ताण असतो. एखाद्यावेळी त्यांना तातडीने गुन्हा दाखल करावासा वाटला तर त्यात त्यांची चूक नाही. मात्र तरीही पोलीसांनी गुन्हा दाखल करताना काळजी घ्यावी, यात सर्वसामान्यांचा पैसा आणि वेळ वाया जातो, याचें भान राखायला हवं. एकाच प्रकरणात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करता येत नाहीत, कायद्याने त्यापैकी एकच गुन्हा दखलपात्र राहतो हो गोष्टी पोलीसांनी ध्यानात का राहत नाही?, असा सवालही खंडपीठाने सुनावणीवेळी उपस्थित केला होता.
महात्मा फुले आणि आंबेडकरांवरील विवादित वक्तव्याचा निषेध करण्यासाठी संदीप कुदळेने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात रात्री बारा वाजता त्यांच्या कोथरुडमधील बंगल्याबाहेर एक व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. संदीप कुदळेला पोलिसांनी अटक करत समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला होता.