जयंतीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शिरसाट यांनी डीजेबंदीचे केले समर्थन (Photo Credit- X)
गणेशोत्सव आणि शिवजयंतीदरम्यान शहराने डीजेमुक्तीचा आदर्श निर्माण केला असून, इतर जिल्हेही त्याचे अनुकरण करत आहेत, असे शिरसाट यांनी नमूद केले. हा आदर्श कायम राखण्याचे आवाहन त्यांनी आयोजकांना केले.
सुरक्षा व्यवस्था : 1200 पोलिस कर्मचारी, 100 अधिकारी, एसआरपीएफची प्लाटून
मिरवणुका 4 मुख्य आणि 240 उपमिरवणुका
अभिवादन स्थळे : 96 पुतळे, 150 ठिकाणी प्रतिमा पूजन, 102 अभिवादन केंद्रे
सुविधा : 15 पाणपोई, 5 मोबाईल टॉयलेट
गेल्या वर्षीच्या जयंतीनंतर तब्बल 2,074 नागरिकांना बहिरेपणाचा फटका बसल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. एका घटनेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की भांडणातील की, काही तासांनंतरच त्यांची श्रवणशक्ती पूर्ववत झाली. कायद्याचा आदर ठेवत डीजेबंदी पाळावी.
अनधिकृत पोस्टर काढताना एका महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेची आठवण करून देत महापौर समीर राजुरकर यांनी यंदा बॅनरबाजीवर कठोर कारवाईचे संकेत दिले. भडकल गेट परिसरात पाणी, मोबाईल टॉयलेट आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीचे वेळापत्रक दुपारी चारचे असतानाही पालकमंत्री दीड तास उशिरा पोहोचल्याने बैठक उशिरा सुरू झाली. साडे तीनपासून उपस्थित असलेल्या नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त करत ही सर्वसामान्यांची बैठक असूनही आम्हालाच थांबावे लागते, अशी प्रतिक्रिया दिली.
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याचा आरोप, भीमसैनिकांचा तीव्र निषेध






