औरंगाबाद : ऑर्बिट इलेक्ट्रोमेट इंडिया कंपनीत भागीदार करण्याचे अमिष दाखवून कंपनीच्या एमडीने सोनालिका मेटल कॉर्पोरेशन कंपनीकडून वारंवार मालाची खरेदी केली. मात्र, त्याबदल्यात स्वतःच्या कंपनीत 50 टक्के भागीदारी देण्याचे अमिष दाखवून 6 कोटी 78 लाखाची फसवणूक करून पसार झाला. याप्रकरणी दोन वर्षापुर्वी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तपास सुरू असताना आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी ऑर्बिट कंपनीच्या एमडीला छत्तीसगडच्या भिलाई येथून अटक केली. अनिल राजदयाल राय असे अटकेतील भामट्याचे नाव आहे.
[read_also content=”गायिका वैशालीच्या हत्येचा रचला जातोय कट ? स्वतः फेसबुकला पोस्ट करून व्यक्त केली भीती https://www.navarashtra.com/regional-cinema/other-entertainment/a-plot-is-being-hatched-to-assassinate-singer-vaishali-fear-expressed-by-facebook-post-itself-nraa-240588.html”]
देवराम संताराम चौधरी सोनालीका मेटल कार्पोरेशन यांनी पोस्टे एमआयडीसी वाळुन येथे तक्रार दिली की, सन 2017 मध्ये औरंगाबाद येथील ऑरबिट इलेक्ट्रोमेट इंडिया प्रा.लि. MIDC वाळूज औरंगाबाद या कंपनीचे मैनेजिंग डायरेक्टर अनिल राजदयाल राय यांनी सोनालिका मेटल कॉपरेशन कंपनीकडून वेळोवेळी स्टेनलेस स्टिल मालाची खरेदी केली. परंतु सदर खरेदी केलेल्या मालाचे पैसे न देता फिर्यादीस त्या मोबदल्यात त्यांना ऑर्बिट इलेक्ट्रोमेक इंडिया प्रा.लि. L-45 MIDC कंपनीत 50 9% भागिदार आणि कंपनीचे 1,25,000 शेअर्स सर्टीफिकेट देऊन त्यांना डायरेक्टर पदाचे नियुक्ती पत्र दिले. त्यानंतर आरोपी अनिल राजदगाल राय यांनी फिर्यादीस सांगीतले की, डायरेक्टर पदाचे ऑनलाईन प्रक्रियेसाठी 2 ते 4 दिवस लागतील तुम्हाला मुंबईहून येथे प्रत्येकवेळी येणे शक्य होणार नाही, असे सांगुन देवराम चौधरी यांच्या ऑविंट इलेक्ट्रोमेक इंडिया प्रा.लि. कंपनीच्या 10 कोऱ्या लेटरपॅडवर आणि कोऱ्या चेकवर स्वाक्ष-या घेतल्या. त्यानंतर त्यांनी लेटर पैडवर केलेल्या स्वाक्षयांचा दुरुपयोग करून फिर्यादी देवराम चौधरी यांना ऑर्बिट कंपनीचे डायरेक्टर पदावरून परस्पर काढून टाकले. तसेच देवराम चौधरी यांचे नावे असलेले 35 लाख रुपये किंमतीचे 1,25,000 शेअर्स परस्पर राय यांनी स्वतःचे नावावर ट्रान्सफर करुन घेतले. अशा प्रकारे देवराम चौधरी यांची स्टेनलेस स्टिल मालाचे 6 कोटी 43 लाख रुपये व शेअर्सचे 35 लाख असे एकूण 6 कोटी 78 लाख रुपयांची विश्वासघात करून फसवणुक केले बाबत तक्रार दिली होती.
[read_also content=”घोड्यासमोर नाचणारे, घोड्यामागे चालणारे, शराबी, कबाबी, मामा, काका, आजोबा आणि… ‘इथे’ सर्व प्रकारचे वऱ्हाडी मिळतात भाड्यावर https://www.navarashtra.com/latest-news/relatives-getting-on-rent-for-marriage-nrvk-240644.html”]