Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmers E-KYC News: शेतकऱ्यांचे ई-केवायसीकडे दुर्लक्ष; मराठवाड्यात ६.७८ लाख शेतकरी बाकी

सुमारे ४० टक्के अनुदानाची रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप होणे बाकी असून यात अद्यापही सुमारे पावणेसात लाख शेतकऱ्यांचे ई केवायसी प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 22, 2025 | 12:20 PM
Farmers E-KYC News:

Farmers E-KYC News:

Follow Us
Close
Follow Us:
  • मराठवाड्यातील ६ लाख ७८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे ई केवायसी नाही
  • आतापर्यंत ७० लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५ हजार २८७ कोटी ५६ लाख रुपयांचे अनुदान जमा
  • मराठवाड्यातील शेतक-यांसाठी ८ हजार ७०८ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर
Chhatrapati Smbhajinagar News: मराठवाड्‌यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करुन त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ७९ लाख ५० हजार ९१ शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत.त्यातील ७० लाख ९२ हजार ७३४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ५ हजार २८७ कोटींची रक्कम जमाही झाली आहे. अनुदान वाटपाचे प्रमाण ६०.७२ टक्के असल्याचे सूत्रांनी नमूद केले. तर उर्वरित रक्कम खात्यावर जमा करण्याचे काम सुरू आहे. एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या १ कोटी ६ लाख ४९ हजारच्या घरात आहे. ई केवायसी किंवा फार्मर आयडी अर्थात अँग्रीस्टैंक नोंद असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यात कोणतीही अडचण येत नाही.

Senyar Cyclone: 50-60 तासाने होणार विनाश? बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, ताजे अपडेट जाणून घ्या

परंतू विभागातील ६ लाख ७८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे ई केवायसी अद्याप झालेले नसल्याचे समोर आले. फार्मर आयडी अर्थात अॅग्रीस्टेंक नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अतिवृष्टी व पुराचा फटका बसलेल्या मराठवाड्यातील बाधित शेतकऱ्यांना जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या नुकसानपोटी मदतनिधी वाटपाचे काम गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. आतापर्यंत ७० लाख ९२ हजार ७३४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५ हजार २८७ कोटी ५६ लाख रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

४० टक्के अनुदानवाटप बाकी

सुमारे ४० टक्के अनुदानाची रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप होणे बाकी असून यात अद्यापही सुमारे पावणेसात लाख शेतकऱ्यांचे ई केवायसी प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. मराठवाड्यात अतिवृष्टी, पुरामुळे मराठवाड्यात ३२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मान्सुनपूर्व पावसाने फटका दिल्यानंतर जुन जुलै महिन्यातही अनेक मंडळात अतिवृष्टी झाली. नुकसानीचे एकीकडे पंचनामे सुरु असतानाच दुसरीकडे पावसाचा कहर देखील सुरुच होता.

पंचनामे पूर्ण करत जिल्हानिहाय निधीची मागणी झाली आणि शासनाने टप्या टप्प्याने जून ते सप्टेंबरपर्यंत झालेल्या नुकसान भरपाईसाठी मदतनिधी मंजूर केला, या निधीचे डीबीटी प्रणालीद्वारे संबंधित बाधित शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसापासून वाटप सुरु आहे. यात बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जात आहे. दरम्यान, अतिवृष्टी, पुरामुळे बाधित झालेल्या मराठवाड्यातील शेतक-यांसाठी ८ हजार ७०८ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केलेला आहे.

काचेच्या तुकड्यांपासून बनवल्या जाणाऱ्या कुंदन दागिन्यांची ‘ही’ आहे खासियत, जुन्या दागिन्यांचा रंजक इतिहास
जिल्हानिहाय अनुदान वाटप जाहीर

राज्यातील विविध जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना सरकारतर्फे अनुदान वितरीत करण्यात आले असून, एकूण ७० लाख ९२ हजार ७३४ शेतकऱ्यांना ५२८७.५६ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हानिहाय अनुदानाचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत:

छ. संभाजीनगर – बाधित शेतकरी ७,६५,४७५, अनुदान ₹५९९.१३ कोटी
जालना – ५,९२,१७७ शेतकरी, अनुदान ₹४०४.७३ कोटी
परभणी – ८,३३,९२७ शेतकरी, अनुदान ₹५५३.१८ कोटी
हिंगोली – ४,९६,५६६ शेतकरी, अनुदान ₹३९१.८१ कोटी
नांदेड – ११,३१,३५६ शेतकरी, अनुदान ₹९११.३८ कोटी
बीड – १३,३१,८६५ शेतकरी, अनुदान ₹९८४.४९ कोटी
लातूर – ११,५०,७६३ शेतकरी, अनुदान ₹७५५.७० कोटी
धाराशिव – ७,९०,६०५ शेतकरी, अनुदान ₹६८७.११ कोटी

यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, शासनाने पुढील काही दिवसांत जिल्हानिहाय अनुदान वितरण प्रक्रियेला अधिक गती देण्याचे संकेत दिले आहेत.

 

 

Web Title: Farmers e kyc news farmers neglect e kyc 678 lakh farmers left in marathwada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 12:20 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.