औरंगाबाद : दरवेळेस काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडून आरोप करण्यात येतो की एमआयएम मुळे भाजपचे उमेदवार निवडून येत असतात. आम्ही राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोबत युती करण्यास तयार आहोत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रस्ताव दिल्यास आम्ही युती करायला तयार असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने आम्हाला ऑफर दिल्यास आम्ही त्यांच्या सोबत युती करण्यात येणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
अनेक निवडणुकांमध्ये एमआयएम आपले उमेदवार उभे करीत असल्याने याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पडत असून यामुळे भाजपाचे उमेदवार निवडून येतात एम आय एम चा फायदा भाजपाला सरळपणे होत असल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून होत असतो. यावरती पर्याय म्हणून आज खासदार इम्तियाज अली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करण्याचा प्रस्ताव माध्यमांशी बोलताना ठेवला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना आज दिली.
[read_also content=”फिनलँड सलग ५व्या वर्षी ठरला जगातील सर्वात आनंदी देश; तर पाकिस्तान भारताच्याही पुढे https://www.navarashtra.com/world/worlds-happiest-country-finland-worlds-happiest-country-for-fifth-year-in-annual-world-happiness-table-nrak-256769.html”][blurb content=””]