Sambhajinagar Schools Reopen : दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट; विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शनाचे नियोजन

Sambhajinagar Schools Reopen : दिवाळीच्या २० दिवसांच्या सुट्टीनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा सोमवार, २३ नोव्हेंबरपासून नियमित सुरू होणार
Diwali Vacation From November 23; Assessment Tests in December Sambhajinagar ( 23 नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी; डिसेंबरमध्ये संभाजीनगरमध्ये मूल्यमापन चाचणी ) फोटो सौजन्य AI
Diwali Vacation From November 23; Assessment Tests in December Sambhajinagar ( 23 नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी; डिसेंबरमध्ये संभाजीनगरमध्ये मूल्यमापन चाचणी ) फोटो सौजन्य AI
Published on: 
Updated on: 
  • सोमवारपासून शाळा नियमित वेळापत्रकानुसार सुरू  
  •  विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन आणि उपचारात्मक अध्यापन 
  • विद्यार्थ्यांसमोर अभ्यासाचे आव्हान 

Sambhajinagar Schools Reopen :  छत्रपती संभाजीनगर दिवाळीच्या दीर्घ सुट्ट्यांनंतर सोमवार, २३ नोव्हेंबरपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांचे नियमित वर्ग पुन्हा सुरू होणार आहेत. तब्बल तीन आठवड्यांच्या सुट्टीनंतर शाळांचे आवार पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजणार असून, दुसऱ्या सत्रातील शैक्षणिक कामकाजाला वेग येणार आहे.

 सोमवारपासून शाळा नियमित वेळापत्रकानुसार सुरू

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या नियोजनानुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांना २ नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी सुरू झाली होती. सुरुवातीला १९ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी देण्याचे नियोजन होते. मात्र, शिक्षण समितीच्या निर्णयानंतर सुट्टी २१ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली. त्यामुळे २ ते २१ नोव्हेंबर असे एकूण २० दिवस शाळांना सुट्टी मिळाली.

रविवारची सुट्टी संपल्यानंतर सोमवारपासून शाळा नियमित वेळापत्रकानुसार सुरू होतील. दरम्यान, इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एससीईआरटी) घेण्यात येणारी संकलित मूल्यमापन चाचणी (पेंट) आता डिसेंबरमध्ये होणार आहे. यापूर्वी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चाचणी घेण्याचे नियोजन होते. मात्र, सुधारित वेळापत्रकानुसार २, ३ आणि ५ डिसेंबर रोजी ही चाचणी घेतली जाणार आहे.

 विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन आणि उपचारात्मक अध्यापन

२ डिसेंबरला प्रथम भाषा, ३ डिसेंबरला गणित, तर ५ डिसेंबरला तृतीय भाषा अर्थात इंग्रजी विषयाची परीक्षा होईल. या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती, विषयज्ञान आणि मूलभूत शैक्षणिक क्षमतांची पडताळणी केली जाणार आहे. चाचणीतील गुणांच्या आधारे अध्ययनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन आणि उपचारात्मक अध्यापन राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांसमोर अभ्यासाचे आव्हान

दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरू होताच शिक्षकांना नियमित अध्यापनासोबतच पेंट चाचणीची तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत शाळांमधील शैक्षणिक उपक्रमांना वेग येणार असून, विद्यार्थ्यांसमोरही अभ्यास आणि तमूल्यमापनाचे आव्हान असणार आहे.