औरंगाबाद : समर्थ नगर परिसरातील मनपाचे झोन क्रमांक 2 कार्यालयासमोर पार्किंग आणि पायर्यांच्या कामासाठी कार्यालयासमोरच पाच ते सहा फुटाचा मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येत आहे.
[read_also content=”शिवसेना नेते, सामाजिक कार्यकर्ते अशोकराव भावके यांचे अपघाती निधन ; मातोश्री सहकारी संस्था, श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे संस्थापक https://www.navarashtra.com/latest-news/paschim-maharashtra/satara/accidental-death-of-shiv-sena-leader-social-activist-ashokrao-bhavke-founder-of-matoshree-co-operative-society-shri-santkripa-shikshan-sanstha-nrab-239328.html”]
संबंधित बिल्डिंगमध्ये मनपा झोनचे कार्यालय असून त्याचप्रमाणे तिथे भरोसा आणि महिला तक्रार निवारण केंद्र असून, यामुळे या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. ठेकेदारने पार्किंगच्या रस्त्याच्या आणि पायऱ्याच्या कामासाठी सदरील खोदकाम केले असून मात्र कार्यालयात जाण्यासाठी मार्ग न सोडल्याने याठिकाणी अनेक वृद्ध नागरिकांचे खड्ड्यात उतरून पुन्हा चढण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येत आहे.संबंधित झोन दोन क्रमांक कार्यालयात सात ते आठ वार्डाचे करवसुलीची कामे येथे चालतात त्यामुळे येथे नागरिकांची कर भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सहाय्यक आयुक्त आठवले यांच्याशी माध्यमांनी चर्चा केल्यावरती त्यांनी सांगितले की सदरील कार्यालयाला मागच्या बाजूला दरवाजा असून नागरिकांनी त्या दरवाजाचा वापर करावा असे आव्हान त्यांनी केले आहे. मात्र अशी फलक कार्यालयासमोर नसल्याने नागरिक समोरच्याच मार्गाचा वापर करताना दिसून येत आहे, या ठिकाणी असणारा बोर्ड किंवा माहिती फलक लावणे गरजेचे आहे. नागरिकांना माहिती नसल्याने नागरिक मुख्य गेट यातूनच प्रवेश करताना दिसून येत असून यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात हाल होत असून, सामाजिक कार्यकर्ते समीर जेजुरीकर यांनी यासंदर्भात मनपाकडे तक्रार दाखल केली असून आज मनपाच्या पथकाच्या वतीने सदरील कामाची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. यासंदर्भात ताबडतोब उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
[read_also content=”हिजाब वादात आता दहशतवाद्यांची एन्ट्री! देशातील मुस्लिमांनी नवा देश स्थापन करण्याची मागणी करत व्हिडिओद्वारे देशातील मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न https://www.navarashtra.com/world/terrorists-now-enter-hijab-controversy-attempts-to-provoke-muslims-in-the-country-through-video-demanding-muslims-to-establish-a-new-country-nrvk-239332.html”]