Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वॉर रूमची करण्यात आली स्थापना! हेतू ” विविध आरोग्य योजनांचा समन्वय साधने अन् निधीचा अपव्यय टाळणे”

राज्यातील विविध आरोग्य योजनांचा समन्वय साधण्यासाठी आणि निधीचा अपव्यय टाळण्यासाठी ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 20, 2025 | 07:56 PM
वॉर रूमची करण्यात आली स्थापना! हेतू ” विविध आरोग्य योजनांचा समन्वय साधने अन् निधीचा अपव्यय टाळणे”
Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील विविध आरोग्य योजनांचा प्रभावी समन्वय साधण्यासाठी आणि दुहेरी लाभ तसेच निधीचा अपव्यय टाळण्यासाठी “वॉर रूम” स्थापन करण्यात येत आहे. ही ‘वॉर रूम’ मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या देखरेखीखाली कार्य करणार असून, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली हा कक्ष स्थापन होणार आहे.

आयुष्यात यश मिळवायचे आहे तर अंगी जपा ‘हा’ गुण; करिअरमध्ये होईल भरारी

या उपक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे राज्यातील सर्व आरोग्य योजनांचे सुसूत्रीकरण, पारदर्शकता वाढवणे आणि पात्र रुग्णांना तातडीने उपचारांची मदत उपलब्ध करून देणे हा आहे. सध्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना आणि इतर अनेक योजना नागरिकांना मोफत किंवा सवलतीच्या दरात आरोग्यसेवा पुरवतात. मात्र काही वेळा एकाच रुग्णाने दोन-तीन योजनांचा एकाच वेळी लाभ घेतल्याच्या घटना आढळल्या आहेत. त्यामुळे निधीचा अपव्यय रोखण्यासाठी आणि सर्व योजनांची समन्वित अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी ही वॉर रूम कार्यरत राहील.

नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व आरोग्य योजनांविषयी माहिती, मार्गदर्शन आणि मदत मिळावी यासाठी एकच टोल-फ्री क्रमांक – 1800 123 2211 उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावरून नागरिकांना तात्काळ माहिती, अर्ज सादर करण्यासंबंधी मदत, तसेच तक्रारींचे निवारण करता येईल. या सर्व प्रक्रियेवर मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे थेट नियंत्रण राहणार आहे.

राज्यात या उद्देशासाठी १२ सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष प्रवीण परदेशी असतील, तर सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, महिला व बालविकास, कामगार, आदिवासी विकास, अल्पसंख्यांक विकास, दिव्यांग कल्याण आणि विधी व न्याय विभागांचे वरिष्ठ अधिकारी सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे सहाय्यक संचालक हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

मुलाखतीच्या अगोदर करा ‘ही’ पाच कामे! लगेच मिळेल नोकरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार केंद्र व राज्य शासनाच्या सर्व आरोग्य योजनांचे एकत्रीकरण करून पारदर्शकतेतून अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. “प्रत्येक पात्र नागरिकाला योग्य योजनेचा लाभ मिळावा आणि निधी खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, हा या वॉर रूमचा उद्देश आहे,” असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

Web Title: Cm announces health war room to be managed by a team under mitra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 07:56 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.