Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही योजना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एप्रिल २०२३ मध्ये सुरू करण्यात आली.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 24, 2024 | 07:27 PM
"हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी..."; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

"हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी..."; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्यभरात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या अंतर्गत ठिकठिकाणी १६ हजार मेगावॅट क्षमतेचे वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबर्डा आणि धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी येथील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.

यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर – सिंह, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीज उपलब्ध होईल. राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी 16 हजार मेगावॅट इतकी वीज देतो. पंपांना वीज पुरवठा करणारे सर्व कृषी फीडर सौरऊर्जेवर चालविण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० अंतर्गत काम सुरू केले आहे. टप्प्याटप्प्याने हे सर्व फिडर सौर उर्जेवर चालविण्यात येतील.

या कार्यक्रमाला उंबर्डा आणि नारंगवाडी गावातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) तालुक्यातील उंबर्डा येतील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची क्षमता ४ मेगावॅट आहे. या प्रकल्पामुळे १७११ शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार आहे. धाराशीव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथील प्रकल्प २ मेगावॅट क्षमतेचा आहे. एकूण ८४५ शेतकरी या प्रकल्पाचे लाभार्थी आहेत. वाशिम आणि धाराशीव जिल्ह्यातील एक – एक सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प यापूर्वीच सुरू झाले आहेत.

🕚 स. ११ वा. | २४-१२-२०२४📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत सचिवांची आढावा बैठक तथा 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०' च्या लोकार्पण कार्यक्रमाला सुरुवात
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में सचिवों की समीक्षा बैठक एवं… pic.twitter.com/sVDR80tv26

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 24, 2024

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेतील पहिल्या पाच प्रकल्पांचे लोकार्पण मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोबर महिन्यात करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत राज्यात नोव्हेंबर अखेर १५,७०८ मेगावॅट क्षमतेचे सौर वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यापैकी ६६९ मेगावॅट क्षमता कार्यान्वित झाली आहे. त्यामधून १,३०,४८६ शेतकऱ्यांना दिवसा आठ तास थ्री फेज वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

राज्यात शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा आणि रात्री अशा दोन पाळ्यांमध्ये वीज पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना केवळ दिवसा भरवशाचा वीज पुरवठा करावा अशी अनेक दशकांची मागणी आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही योजना मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एप्रिल २०२३ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेत राज्यभरात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारून विकेंद्रीत स्वरुपात कृषी फीडर्सना विजेचा पुरवठा करण्यात येईल. त्यातून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होईल तसेच या योजनेत किफायतशीर दरात वीज मिळाल्यामुळे राज्य सरकारचे अनुदान आणि उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी होईल.

Web Title: Cm devendra fadnavis said maharashtra farmers create a second green revolution through green energy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 07:26 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis

संबंधित बातम्या

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन
1

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन

सांगलीतील उटगीत सशस्त्र दरोडा, सळईने मारहाण; लाखोंचा मुद्देमाल लंपास
2

सांगलीतील उटगीत सशस्त्र दरोडा, सळईने मारहाण; लाखोंचा मुद्देमाल लंपास

Online Gaming बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! लवकरच बंदी घालण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांनी केली घोषणा
3

Online Gaming बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! लवकरच बंदी घालण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांनी केली घोषणा

Devendra Fadnavis: कोकाटेंच्या रमी प्रकरणावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले, “त्यांचे चुकलेच, आमच्यासाठी ते…”
4

Devendra Fadnavis: कोकाटेंच्या रमी प्रकरणावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले, “त्यांचे चुकलेच, आमच्यासाठी ते…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.