एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या; सोशल मीडियावर दिली होती जिवेमारण्याची धमकी
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभरानंतर महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार. शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे. यानंतर आता सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला असून, जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. दरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना झाले, त्याआधी त्यांनी आपल्या दरे गावी पत्रकारांशी संवाद साधला.
सत्ता स्थापनेच्या धावपळीतच एकनाथ शिंदे गावी निघून गेल्यामुले चर्चांना उधाण आलं होतं. गावी आल्यानंतर तब्येत बिघडली होती. त्यानंतर दरे येथील त्यांच्या बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल झाली. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे यांनी घरीच आराम करणे पसंत केले. यानंतर त्यांची तब्येत आता ठीक असून मुंबईकडे रवाना झाले आहेत.
अमित शाहांसोबत एक बैठक झाली होती. आता आमची तिघांची बैठक होईल. यातून महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. राज्याने खूप दिलं आहे. राज्यात लवकर चांगलं सरकार स्थापन व्हावे, अशी जनतेची इच्छा आहे. लोक काय बोलतात, विरोधक काय बोलतात, याच्याशी आम्हाला घेणे-देणे नाही. महायुतीत कोणताही समन्वयाचा अभाव नाही. भूमिका परत परत मांडण्याची गरज नाही. मी यापूर्वीच सांगितलं आहे की, भाजप जो निर्णय घेईल, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या खात्यांच्या चर्चा सुरू आहेत आणि या चर्चेतून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. लोकांनी निवडून दिले आहे, जी आश्वासने आम्ही दिली आहेत, ती आम्हाला पूर्ण करायची आहेत. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने लोकांशी आम्ही बांधील आहोत आणि ती बांधीलकी जपायची आहे. मला काय मिळाले, कोणाला काय मिळाले, यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे, हे महत्त्वाचं आहे. जनतेने आम्हाला भरभरुन दिले आहे, आमच्यावर मतांचा वर्षाव केला आहे, आता आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या होत्या. आम्हाला जनतेने यश प्रचंड बहुत दिलं. मी मागच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्ट केली होती. नरेंद्र मोदी आणि अमित शाहा मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतील, त्याला माझा आणि माझ्या शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल. आमच्या मनात किंतू-परंतू नाही आणि इतर कुणाच्याही मनात नसावा, असंही त्यांनी स्पष्ट केलं.