bjp minister pankaja munde meets dhananjay munde after resign marathi news
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज सोमवारी गोपीनाथ गडावर (Gopinathgad) अर्धातास मौन पालन केले. महापुरुषांच्या अवमानप्रकरणी (Contempt Of Great Men) त्यांनी अनोख्या मार्गाने निषेध नोंदवला. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची आज जयंती आहे असून त्यानिमित्त पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे (Pritam Munde) या गोपीनाथ गडावर आहेत.
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झाला. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष आक्रमक झाले. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गटातील मंत्रीही याप्रकरणी उघड-उघड संताप व्यक्त करत आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची त्यांनी औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याने गोची केली आहे. त्यांच्या हकालपट्टीची मागणी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केली. कोश्यारी यांना पुण्यात काळे झेंडेही दाखवण्यात आले. तर राज्यपालांच्या विधानानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळेही वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी पुण्यात त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली. या साऱ्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावर अर्धातास मौन धारण केले.