मुंबई : गुजरात, महाराष्ट्र ह्यांसह देशातील विविध प्रांतातील १६ समकालीन चित्रकारांनी (Contemporary Painters) सादर केलेले त्यांच्या चित्रांचे व शिल्पाकृतींचे (Paintings and Sculptures) सामूहिक कलाप्रदर्शन (Art Exhibition) हिरजी जहांगीर कलादालन, महात्मा गांधी रोड, काळा घोडा, मुंबई ४०० ०००१ येथे १४ ते २० मार्च २०२२ ह्या दरम्यान भरणार आहे. ते तेथे सर्व रसिकांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल.
ह्या प्रदर्शनाचे उदघाटन १४ मार्च २०२२ रोजी हिरजी जहांगीर कलादालनात श्रीमती उर्मिलाबेन कनोरिया, चेअरपर्सन, कनोरिया सेंटर ऑफ आर्ट, अहमदाबाद, विश्वनाथ साबळे – डीन, सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई व नरेंद्र विचारे, – डायरेक्टर, वसंतदादा पाटील महाविद्यालय, मुंबई ह्यांच्या हस्ते होणार असून त्यावेळी बरेच कलाप्रेमी, रसिक व संग्राहक उपस्थित राहतील.
भारतातील विविध प्रांतातील सांस्कृतिक व सामाजिक मूल्यांचा समन्वय व तत्सम आशयघनता दर्शविणारी विविधांगी चित्रे व शिल्पाकृती येथे ठेवण्यात येतील.
वृंदावन सोलंकी , गांगजी मानपारा, उमेश क्यादा, मिलन देसाई, अजित चौधरी, नटू तांडेल, नवनीत राठोड, कैलास देसाई, सज्जाद कापसी, अजित भांडेरी, राजेश मुलिया, आणि हरदेव जेठवा – तसेच ह्यात सहभागी होणारे सन्माननीय कलाकार – रवी परांजपे पुणे, प्रकाश बाळ जोशी मुंबई, बाबुभाई मिस्त्री – मुंबई आणि अमृत पटेल – नवी दिल्ली.
ह्या प्रदर्शनात विविध आशयघन व बहुआयामी चित्रे व शिल्पाकृती ठेवण्यात येतील त्यात सर्वांना अनेक माध्यमातून व तंत्रशुद्ध शैलीत बनविलेला चित्रांचा व सौंदर्यदृष्टीने परिपूर्ण अशा कलाकृती बघण्याचा आनंद घेता येईल. त्यात प्रामुख्याने खालील कलाकृतीचा समावेश आहे.
हरदेव जेठवा व उम्श क्याडा, ह्यांच्या चित्रातून सर्वांना मिळणार आनंदी, सुखी व समाधानी तसेच उत्साहजनक अनुभूतीचा अनुभव, जीवना च वातावरणातील समतोल राखण्याचा व त्यासाठी वृक्ष व नैसर्गिक संपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचा नवनीत राठोड व कैलास देसाई, ह्यांच्या चित्रातून आढळणारा संदेश, आनंदी जीवन व वैश्विक शांतीचा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या राजेश मुलिया ह्यांच्या शिल्पाकृती, गुढवादी विश्वाला जिवंत करणारे गगजी मोनपरा चे शिल्प,जीवनातील वास्तव दर्शविणारी वृंदावन सोलंकी ह्यांची सुरीली चित्रे, वारली संस्कृती व तिचे वैशिट्यपूर्ण पैलू दाखविणारी अजित चौधरी ह्यांची चित्रे, साध्या आकृती व विविध भूमितीय रचना व वैशिट्ये ह्यातून सज्जाद कापसी , बाबुभाई मीस्त्री, अजीत भंडेरी ,ह्यांनी दर्शविलेली मानवी जीवनयात्रेतील विविध पैलूंची आशयघनता, शहरीकरणामुळे नागरी जीवनात होणारी स्थित्यंतरे व पर्यावरणाचा ऱ्हास व तो नाहीसा होण्यासाठी आवश्यक असणारी मानसिकता व प्रयत्न दर्शविणारी प्रकाश बाळ जोशी ह्यांची चित्रे, सांस्कृतिक विशेष व परंपरा दर्शविणारी रवी परांजपे ह्यांची वैशिष्ट्यपूर्ण तसेच आपल्या मूलभूत सौंदर्याने नटलेली चित्रे वगैरे ठेवण्यात येतील.