काँग्रेसला मोठा धक्का! मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बाळासाहेब थोरात पराभूत
विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निकालानंतर महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कॉंग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचाच्या शर्यतीत असलेले बाळासाहेब थोरात संगमनेरमधून पराभूत झाले आहेत. शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ विजयी झाले आहेत. संगमनेर मतदारसंघ बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र महायुतीच्या लाटेत बाळासाहेब थोरात यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
निवडणूक निकालाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
बाळासाहेब थोरात काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या पंक्तित स्थान दिले जातं. याच कारणामुळे राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळालं असतं तर बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्रिपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक मानले जात होते. मात्र मतमोजणीच्या पहिल्याच कलात बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर गेले होते. अमोल खताळ पहिल्यापासूनच आघाडीवर राहिले.
बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीचे कॉंग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार होते. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने अमोल खताळ यांना तिकीट दिलं होतं. ते महायुतीचे अधिकृत उमेदवार होते. त्यांनी मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच बाळासाहेब थोरात यांना पिछाडीवर सोडलं होतं. त्यामुळे संगमनेरमध्ये नेमके काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर अमोल खताळ विजयी झाले आहेत. बाळासाहेब धोरात यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभव झाला आहे. कॉंग्रेससाठी हा मोठा धक्का् मानला जात आहे.