अक्षय शिंदेचं कुटुंब रस्त्यावर येणार? नक्की काय आहे प्रकरण?
मुंबई : बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला. यानंतर राज्यामध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांवर अक्षयने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये स्वरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या प्रतिहल्ल्यामध्ये अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाला. बदलापूर प्रकरणातील आरोपीला भररस्त्यामध्ये फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणारे विरोधक एन्काऊंटर झाल्याने टीका करत होते. त्यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या एन्काऊंटरच्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीची ऑडिओ क्लीप शेअर केली आहे. यामध्ये पोलीस व्हॅनला पडदे होते आणि पोलीस साध्या वेषामध्ये होते, असा दावा केला आहे. यावर आता राज्य सरकारमधील मंत्र्यांची पहिल्या मंत्र्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्वीटर हॅन्डलवरुन ऑडिओ क्लीप शेअर केली आहे. शेअर करताना आव्हाड यांनी लिहिले आहे की, ‘अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे. ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका… निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती,’ असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. त्या ऑडिओ क्लीपमध्ये पोलीस व्हॅनला पडदे लावण्यात आल्यामुळे आतील काहीच दिसत नव्हते. गाडीमधून अचानक गोळी मारल्याचा आवाज आला. त्यानंतर दोन पोलीस खाली उतरले. हे पोलीस साध्या वेषात होते. ते पुन्हा गाडीमध्ये गेल्यानंतर आणखी एकदा गोळीचा आवाज आला, असा दावा प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने ऑडिओ क्लीपमध्ये केला आहे. सोशल मीडियावर ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका…
निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती. pic.twitter.com/tfnkQ6HmkU— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 28, 2024
काय म्हणाले दीपक केसरकर?
शिंदे गटाचे नेते व मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना अक्षय शिंदे प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी व्यक्तीच्या कथित ऑडिओ क्लीपवर प्रतिक्रिया दिली. मंत्री केसरकर म्हणाले की, “बदलापूर प्रकरणातील आरोपीला म्हणजेच अक्षय शिंदेला फाशी द्या म्हणून मोर्चा काढणारेही हेच लोक आहेत. एन्काउंटर कधीही मुद्दाम केला जात नाही. त्या गुन्हेगाराने पोलिसांवर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या अशा प्रकरणांमध्ये चौकशी केली जाते. या मृत्यू प्रकरणाची देखील चौकशी केली जाणार असून लवकरच सत्य आपल्यासमोर येईल,” असे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले
पोलीस स्वसंरक्षणासाठी अशी कृती करतात
पुढे ते म्हणाले की, “कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना घडत नाहीत. अक्षय शिंदे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसjम होता. असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे इसम पोलिसांवरही हल्ले करायला मागेपुढे बघत नाहीत. अशा हल्ल्यांत पोलीस जखमी झाले असतील तर स्वसंरक्षणासाठी प्रतिहल्ला करण्याशिवाय पोलिसांसमोर पर्याय नसतो. पोलीस स्वसंरक्षणासाठी अशी कृती करतात ही वस्तुस्थिती आहे. आता ही कृती योग्य आहे की अयोग्य हे यंत्रणाच ठरवेल. पोलीस तापासानंतर सत्य आपल्यासमोर येईल,” असा विश्वास शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. आणि राज्य सरकारची भूमिका व्यक्त केली आहे.