
पंढरपूर : कोरोनाच्या काळामध्ये विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद असताना मंदिर समितीच्या व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे याच काळात मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात महापूजेच्या वेळी दूध दह्याचा वापर करण्यात आला असल्याची चर्चा भाविक व तज्ञ मंडळीकडून होत आहे. विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस यापूर्वी चार वेळा पुरातन विभागाकडून वज्रलेप करण्यात आला. दर्शन बंद असतानाही मूर्तीची झीज कशी झाली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुरातन विभागाने वज्रलेप झाल्यानंतर दही दुधाचा वापर कमी प्रमाणात करावा अशा सूचना मंदिर समितीला दिल्या होत्या परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान तातडीची बैठक बोलावण्यात येणार आहे अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
[read_also content=”गर्मीत घरीच बनवा केशराची चविष्ट कुल्फी; सोपं आहे साहित्य आणि कृती https://www.navarashtra.com/lifestyle/make-saffron-kulfi-at-home-only-use-these-easy-tips-nrak-267894.html”]