मुंबई: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोप अक्षय शिंदेचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. मुंब्रा बायपासवर पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या एन्काऊंटरवरून राज्यभरातून पोलिसांचे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे, विरोधकांकडून राज्य सराकारवर आरोपवर केले जात आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीदेखील या एन्काऊंटरवरून सूचक विधान केले आहे. एखाद्याने हल्ला केला तर पोलीस टाळ्या वाजवत बसणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’च्या व्यासपीठावरुन बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. या कार्यक्रमात बोलताना त्यांना अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरून होणाऱ्या आरोपांविषयी विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एखाद्या गुन्हेगाराचा एन्काऊंटर व्हावा,असे आमचे मत नाही. पण कोणत्याही गुन्हेगारीच्या प्रकरणात कायद्याचे पालन झाले पाहिजे, त्याला कायद्याच्या चौकटीतूनच शिक्षा झाली पाहिजे. ही सर्व प्रक्रिया वेगाने झाली पाहिजे, असे माझे व्यक्तीश: मत आहे. पण पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. आमचे पोलीस एखाद्याने हल्ला केल्यावर टाळ्या वाजवत बसणार नाहीत.
हेही वाचा: सतर्क राहा! आज ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार, जाणून घ्या हवामानाची स्थिती कशी राहिल?
दरम्यान, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरून पोलिसांच्या प्रतिक्रीयेवरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. अक्षय शिंदेला बंदूक चालवता येत होती री, प्रशिक्षण नसतानाही त्याने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून त्याचे लॉक उघडून फायरिंग कशी करू शकतो. पोलीस थेट डोक्यातच गोळी कशी घालू शकतात. असे अनेक प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केले होते. यावरही देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले. “मला न्यायाधिशांवर टीका करायची नाही. पण तुमच्यासमोर कोणी बंदूक घेऊन मारायला आला तकर तुम्ही विचार करत बसणार की त्याचा प्रतिकार करणार, अशा प्रतिप्रश्नही फडणवीसांनी उपस्थित केला.
दरम्यान, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर मुंबई, ठाणे, बदलापूरसह अनेक भागात देवेंद्र फडणवीसांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लागले होते. या बॅनर्सवर ‘बदला पुरा’, ‘देवाचा न्याय’, ‘देवाभाऊ सुपरफास्ट’ असा आशयाचा मजकूर होता. विशेष म्हणजे याबॅनर्सवर फडणवीसांचे हातात बंदूक घेतल्याचे फोटोही झळकवण्यात आले. यावरूनही विरोधकांकडून त्यांच्यावर गंभीर आरोप झाले. यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, हा प्रकार अयोग्य आहे. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचे कधीही उदात्तीकरण होता कामा नये, पण या प्रकाराची गुन्हे अन्वेषण विभागाकडून (CID) नि्ष्पक्ष चौकशी होईल, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिले.
हेही वाचा: मुंबईत सुरू होणार आहे अतरंगी जगाशी जोडलेले म्युझियम, फोटो पाहून थक्क व्हाल