Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गिरीश महाजन अन् एकनाथ खडसे यांच्यातील वाद मिटणार; रक्षा खडसे करणार मध्यस्थी

भाजप नेते गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांच्यामधील वाद सर्वांना माहिती आहे. ते मिटवण्यासाठी भाजपच्या नेत्या व केंद्रीय मंत्री रक्षा खडसे प्रयत्न करणार आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 16, 2024 | 03:04 PM
गिरीश महाजन अन् एकनाथ खडसे यांच्यातील वाद मिटणार; रक्षा खडसे करणार मध्यस्थी
Follow Us
Close
Follow Us:

जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांच्यामधील वाद सर्वांना माहिती आहे. भाजपमध्ये असल्यापासून या दोन नेत्यांमध्ये कटूता होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला राम राम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ही राजकीय नाराजी आणखी वाढली. यानंतर आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे हे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा गड राखणाऱ्या रक्षा खडसे या नाराजी दूर करण्यासाठी मध्यस्थी करणार आहेत.

एकमेकांवरचे आरोप थांबवून एकत्र येण्याची वेळ

भाजपच्या नेत्या व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे या भाजपाच्या निष्ठावान नेत्या म्हणून ओळखल्या जातात. लोकसभेच्या निकालानंतर यांना केंद्रीय मंत्रीपद देण्यात आले. मंत्रीपद मिळाल्यानंतर रक्षा खडसे यांनी पहिल्यांदाच जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विविध राजकीय विषयावर मत मांडले. मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, “गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांनी एकत्र येऊन जळगाव जिल्ह्यासाठी काम केलं, तर त्याचा फायदा येथील जनतेला होईल. दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं, यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. मी मागच्या काही वर्षांपासून दोघांमध्ये संघर्ष आणि वादविवाद बघितला आहे. पण माझी इच्छा आहे, की दोन्ही नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे. एकेकाळी हे दोघे नेते एकत्र होते. त्यांनी जळगाव जिल्ह्यासाठी मोठं काम केलं आहे. मात्र, आता दोघांनी एकमेकांवरचे आरोप थांबवून एकत्र येण्याची वेळ आहे” असे मतरक्षा खडसे यांनी मांडले.

पुढे त्या म्हणाल्या, “जळगावच्या विकासासाठी आता चांगली संधी आहे. गिरीश महाजन आता मंत्री आहेत, गुलाबराव पाटीलदेखील मंत्री आहेत. मी सुद्धा केंद्रीय मंत्री आहे. त्यामुळे आज अनेक मंत्री पदं या जळगाव जिल्ह्याला लाभली आहेत. सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन काम केलं. तर नक्कीच भविष्यात जवळगाव जिल्ह्याचा विकास होऊ शकतो,” असं मत रक्षा खडसे यांनी मांडले.

एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश कधी?

एकनाथ खडसे य़ांनी राष्ट्रावादीमध्ये प्रवेश केल्यानंतर देखील रक्षा खडसे यांनी भाजपमध्ये राहण्याचा निर्धार केला. आता एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर आहेत. याबाबत त्यांनी स्पष्टपणे जाणार असल्याचे सांगितले आहे. मात्र अद्याप त्यांचा पक्षप्रवेश करत घरवापसी झाली नाही. या घरवापसीसाठी गिरीश महाजन यांचा नकार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. यावर रक्षा खडसे म्हणाले, “एकनाथ खडसे मोठे नेते आहेत. त्यामुळे पक्षप्रवेशाबाबतचा निर्णय आमचे केंद्र आणि राज्यातील वरिष्ठ नेते घेतील आणि वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी आपोआप घडतीलच. भारतीय जनता पार्टीबरोबर जेवढी जास्त लोक जोडता येतील, तेवढी चांगलं आहे. त्यामुळे संघटनेची ताकद वाढणार आहे आणि एकनाथ खडसे तर भारतीय जनता पक्षाचे जुने नेते आहेत,” असे मत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मांडले.

Web Title: Dispute between bjp leader girish mahajan and eknath khadse resolved by raksha khadse nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2024 | 03:04 PM

Topics:  

  • girish mahajan
  • Raksha Khadse

संबंधित बातम्या

Leopard Attack: नाशिकमध्ये ‘बिबट्याराज’! भर वस्तीत घातले थैमान, पकडण्यासाठी थेट गिरीश महाजन अन्…
1

Leopard Attack: नाशिकमध्ये ‘बिबट्याराज’! भर वस्तीत घातले थैमान, पकडण्यासाठी थेट गिरीश महाजन अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.