Jitendra Awhad News:
Jitendra Awhad News: “राजीव कुमार या इसमाला निवडणूक आयुक्त म्हणून नेमलं आणि त्यानंतर निवडणुकांची वाट लावली. या सर्व मतचोरीच्या प्रकारामध्ये निवडणूक आयोगाचाही सहभाग होता. सध्या निवडणूक आयोग हा पूर्णपणे कॉम्प्रोमाईज झालेला आहे.” अशा सडेतोड शब्दांत शरद पवारांच्या नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि काही सामाजिक प्रश्नांवर जोरदार टीका केली.
आव्हाड म्हणाले की, “३८ वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशानुसार कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय आहे, पण महाराष्ट्रातील बहुतांश लोकसंख्या मांसाहारी आहेत. आपण सर्वजण मांसभक्षक आहोत आणि अचानक ब्राह्मणवाद आणण्याचा प्रयत्न होतोय. कुठलाही सण-उत्सव बकरा कापून साजरा होतो, हे सत्ताधारी पक्षातील एका नेत्यानेच पूर्वी म्हटलं होतं,” असं आव्हाड यांनी स्पष्ट केलं. जर ते स्वत: बोलत असतील ते हे सर्व का सुरू आहे. मांसविक्री का बंद ठेवली जातआहे, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. पण त्यांना समाजात द्वेष पेटवत ठेवायचा आहे. याला काही अर्थ नाही.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत आव्हाड यांनी सांगितले की, ” बीबीडी हा अडकलेला प्रकल्प मी गृहनिर्माण मंत्री असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही हा प्रकल्प सुरू केला. तिथेच भूमीपुजन झालं. आज तिथे ७२ मजली इमारती उभ्या राहत आहेत. त्याचं मला श्रेय घ्यायच नाही.आता मी मंत्री नाही, ज्यांनी केलय त्यांनी श्रेय घ्यावं. पण मी जे केलं केल. विरोधासाठी विरोध करणे हा माझा स्वभाव कधीच नव्हता.” दादर कबुतरखाना वादावरही त्यांनी भूमिका मांडली. “हा विषय अनावश्यकपणे ताणला जातोय. एखाद्या समाजाने इतकी आग्रही भूमिका घेणं हे समाजहिताचे नाही,” असे ते म्हणाले.
जरांगे पाटील यांच्याबाबत विचारले असता आव्हाड म्हणाले, तुम्हाला एवढ स्पष्ट बहुमत असताना त्यांनी मागेल त्याला आरक्षणाचं आश्वासन देऊन ठेवलं आहे. तुला आरक्षण तुला आरक्षण करता करता सगळ्या समाजात त्यांनी द्वेष निर्माण केला. तुमच्यात जर हिंमत, ताकद आहे तर लोकसभेत कायदा पारित करा ना, जर तुम्ही निवडणूक आयोगाच्या निवड समितीची रचना बदलू शकता तर तुम्हाला किती वेळ लागेल द्या ७० टक्के आरक्षण. बिहार मधील जातिगणना काय दाखवते, बहुजनांची संख्या ही ८०-८५ टक्क्यांहून अधिक आहे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, हे वाक्य आजही भारतात लागू करून दाखवा. जे समाज स्वातंत्र्य काळापासून मुख्य प्रवाहापासून लांब आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे.
India Rain News: ‘या’ राज्यांना अति ते अति मुसळधार पावसाचा इशारा; IMD च्या अलर्टने वाढवले टेन्शन
केंद्र सरकारवर टीका करताना आव्हाड यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख केला. “जेव्हा ट्रम्पला रोखायला हवे होते, तेव्हा मोदी त्यांच्या प्रचारासाठी गेले होते,” असा आरोप त्यांनी केला. संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले, “संजय गायकवाड हे महान तत्वज्ञ आहेत. त्यांच्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याने काही बोलणं योग्य नाही.”